मुसळधार पावसासह आलेल्या वाऱ्याच्या झंझावाताने गुरुवार रात्रीपासून शुक्रवारी सकाळपर्यंत अवघ्या १० तासांत शहरातील विविध भागांमध्ये तब्बल ३४ झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या. या अचानक आलेल्या खराब हवामानामुळे शहरात मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण झाले, वाहतुकीवर परिणाम झाला आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
शहराच्या अनेक भागांमध्ये रस्त्यांवर झाडे कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली. काही झाडे थेट वाहनांवर कोसळली, तर काही सोसायट्यांच्या परिसरात कोसळून मालमत्तेचे नुकसान झाले. अनेक दुचाकी व चारचाकींना नुकसान पोहोचले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
अग्निशमन दलाचे जवान सतत मदतीसाठी सक्रिय होते. त्यांनी वेळीच घटनास्थळी पोहोचून झाडे हटवली आणि रस्त्यावरील अडथळे दूर केले. नागरिकांनी खास करून अंतर्गत रस्त्यांवर झाडे कोसळल्यामुळे हालचालीस अडथळा निर्माण झाल्याची तक्रार केली.
अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, की झाडांची मुळे सडलेली किंवा कमकुवत झालेली होती. पावसामुळे माती ओली होऊन त्यांचा आधार कमी झाला. त्यातच जोरदार वाऱ्यांमुळे झाडे कोसळली.
झाड कोसळण्याच्या प्रमुख ठिकाणांची यादी:
- पुणे सातारारोड, वालवेकर नगर
- लक्ष्मी रोड, फडके हौद चौक
- बिबवेवाडी-कोंढवा रोड, खुशबू हॉटेल
- सिंहगड रोड, निंबाज नगर
- नऱ्हे मनाजी नगर
- कोरेगाव पार्क, लेन क्रमांक ९
- बाणेर, माऊली पंप
- वारजे, आंबेडकर चौक
- हडपसर डीपी रोड
- मार्केट यार्ड, वेंकटेश हॉटेल
- गोखलेनगर, गोपाळकृष्ण मंडळ
- कोथरूड, गिरीजा विहार
- नवले ब्रिज, डोमिनोज पिझ्झा, महारशी नगर पोलीस चौकी
- पुणे सातारारोड, हॉटेल उत्सव
- कोथरूड, सुतारदारा
- नारायण पेठ, माती गणपती
- हिंगणे, गीतांजली सोसा
- कर्वे रोड, करिश्मा सोसा
- धनकवडी, तीन हत्ती चौक
- वानवडी, जगताप चौक
- वडगाव शेरी, सिटी केअर हॉस्पिटल
- कळ्याणी नगर, दर्शन पार्क सोसायटी
- धायरी, डी.एस.के. विश्व रोड
- चव्हाण बाग तलाव कंपनी
- एच.एम. रॉयल सोसायटी
- पाषाण पंचवटी
- सिद्धी वृंदावन, मनाजी नगर
- कोद्रे नगर, मुळा रोड, शेल पंपजवळ
- समर्थ नगर, आशिर्वाद हॉटेल गल्ली, वडगाव
- पाम ग्लो सोसायटी, रिलायन्स मार्ट, बी.टी. कवडे रोड
- ९ नं. कॉलनी, स्वामी समर्थ मंदिराजवळ, घोरपडी पेठ
- भगाली हॉस्पिटल, बिबवेवाडी
- पीजीकेएम शाळा, हॉस्टेल चौक, मार्केट यार्ड
- दुर्गा नगर हौसिंग सोसायटी, सहारा हॉटेल मागे, मॉडेल कॉलनी