कोथरूड मतदारसंघात चंद्रकांत (दादा) पाटील यांच नाव घेतलं की एक आपुलकीचा आस्थेचा आणि मायेचा चेहरा समोर येतो…. कारणही तसंच भारतीय जनता पक्षाची निर्मिती झाल्यापासून कार्यकर्त्यांवरती जीव लावणारा पहिला नेता याच ध्येयी याच डोळी तीन दशकांपासून उपेक्षित चेहऱ्यांना पाहायला मिळाला. कोथरूड विधानसभा मतदारसंघांमध्ये आमदार म्हणून नियुक्ती झाल्यानंतर या स्नेहजीविधातांनी घराघरात आपली स्नेहवेल अशाप्रकारे रोपण केली आहे की आज या स्नेहवलीचा आधारवड कधी झाला हे लाभार्थी लोकांना उमगलेच नाही. कोथरूड विधानसभा मतदारसंघांमध्ये फक्त विविध विकासकामे आणि नागरी सुविधा सुधारण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली त्याबरोबरच पक्ष आणि कार्यकर्त यांची तुटलेली नाळ जोडण्यासाठी चंद्रकांत दादा जणू ‘मिसिंग लिंक’ झाले आहेत. आजमितीला कोथरूड मतदार संघामध्ये पदाणे आणि संबंधाने राष्ट्रीय पातळीवर गेलेल्या नेतृत्वांपेक्षा माणसे जोडणारी चंद्रकांत दादांची ‘मिसिंग लिंक’ची नाळच ‘स्नेहवेली’चा आधारवड वाटत आहे.
कोथरूड विधानसभा मतदारसंघातून आमदार झाल्यानंतर वैश्विक संकट कोविडच्या काळामध्ये या स्नेहवलीच्या रोपणाचा शुभारंभ झाला. दोन-तीन दशक या विधानसभा मतदारसंघात नेतृत्व करणाऱ्या नेत्यांच्या घराची दारे बंद झालेली असतानाच आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी कोथरूड मतदारसंघातील गरजवंतांसाठी या कठीण काळामध्ये अहोरात्र आणि कोणतेही अपेक्षा न करता विविध प्रकारची कामे करण्यास सुरुवात केली. यामध्ये वस्ती विभागातील नागरिकांना कोरोनाची लागण झाल्यानंतर विलीनीकरण शक्य नसल्याने या गरजेवर मात करण्यासाठी अध्ययावत सुविधा असलेले 80 क्षमतेचे क्वारंटाईन सेंटर सुरू केले. संपूर्ण मतदारसंघातील सोसायटीमध्ये निर्जंतुकीकरण स्टॅन्ड अन् घरकाम महिला तपासणी यांचे नियोजन करून नित्यक्रम सुकर करण्याचे काम केले. त्याबरोबरच एकल सदस्य असलेल्या घरामध्ये भोजन योजना अन् अन्नधान्य किट वितरित केल्यामुळे या कठीण काळामध्ये नागरिकांना दैनंदिन गरजा पूर्ण करणे शक्य झाले.
जागतिक महामारी कोरोनाचा काळ सरल्यानंतर रिक्षा चालक मदत म्हणून 6000 सीएनजी कूपन देऊन रिक्षा व्यवसाय पूर्व पदावर आणण्यास मदत केली. असंघटित कामगार मजूर यांच्यासाठी मोफत नाष्टा, जनसेवा रुग्णालय, फिरते रुग्णालय, नाममात्र किमतीत दिवाळी फराळ या कोरोना काळात सुरू झालेल्या उपक्रमांना आजही उत्साही प्रतिसाद मिळत असल्याने अविरत सुरू आहेत. वस्ती विभागातील महिलांना रोजगाराच्या संधी मिळाव्या म्हणून आजपर्यंत 700 महिलांना शिलाई मशीन वाटप करण्यात आले असतानाच या उदयमुख उद्योजकांना मदत करण्यासाठी बचत गट व वैयक्तिक व्यवसाय वृद्धीसाठी १ लाख रुपये बिनव्याजी कर्ज देण्यास सुरुवात केली असून आजपर्यंत 500 महिलांनी लाभ घेतला. याबरोबरच वार्षिक 3500 विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतही सुरू आहे. याबरोबरच ‘सुमक्तर्ष’ या उपक्रमांतर्गत 20% सवलतीच्या दरामध्ये नागरिकांना जीवन आवश्यक कडधान्य व मिठाई वाटप केले जाते. कोथरूड विधानसभा मतदारसंघात महिलांसाठी अत्यंत स्तुत्य ‘मानसी’ प्रकल्प सुरू करण्यात आला असून 15 ते 20 वयोगटातील मुलींसाठी संपूर्ण आरोग्य तपासणी, औषधे व पौष्टिक आहार, योगासने, प्रशिक्षण वर्ग, व्यक्तिमत्त्व विकास कौशल्य प्रशिक्षण देण्याचे कामही केले जाते.
मानसी प्रकल्पाच्या उत्साही प्रतिसादानंतर पुढचे पाऊल म्हणून ‘सुखदा’ प्रकल्प वस्ती विभागातील गरोदर महिलेसाठी सुरू करण्यात आला आहे. सूक्ष्म नियोजित पोषण आहार, तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन, तपासण्या, आरोग्य तपासणी व नामांकित दवाखान्यांमध्ये प्रस्तुतीची सेवा देण्यात येते यामध्ये 136 महिलांची यशस्वी प्रस्तुती करण्यात आली आहे. न याबरोबर 80 महिलांना गोखले बिजनेस बे रोजगाराच्या संधीही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
कोथरूड विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहावे यासाठी मोफत फिरता दवाखाना सुरू करण्यात आला असून 13500 रुपयांच्या मोफत तपासण्या करण्यात येतात. मेमोग्राफी मशीन (ब्रेस्ट कॅन्सर तपासणी), उपचारातील रुग्णांना शासकीय योजना सीएसआरच्या माध्यमातून वैद्यकीय मदतही केली जाते. कोथरूड विधानसभा मतदारसंघातील कुमारिकाचे वैवाहिक आयुष्य सुकर होण्यासाठी नववधूंना ‘झालं’ (१ग्राम सोन्यासह) देण्याचा अभिनव उपक्रम सुरू असून 500 पेक्षा जास्त महिलांना लाभ देण्यात आला आहे. 7000 कुमारिकांसाठी मोफत कापड अन् शिलाई, 40000 महिलांना मोफत सहली (कोल्हापूर +बाळूमामा, तुळजापूर+अक्कलकोट, गोंदवलेकर महाराज, नारायणपूर चैत्यभूमी सहल) आयोजित करण्यात आल्या होत्या. ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘निसर्ग छाया’ उपक्रम अभिनव पद्धतीने सुरू केला असून या अंतर्गत १० हजार ज्येष्ठ नागरिकांना (३ दिवस+ २ रात्री) ‘उत्साह सहल’ आयोजित करण्यात येत आहेत. यामध्ये संगीत मैफल, हास्य क्लब, योगा व पारंपरिक खेळ खेळण्यात येतात. याबरोबरच कथक, शास्त्रीय नृत्य, ढोल ताशा पथक अशा कलाकारांनाही प्रोत्साहन व भरीव मदत केली जाते.
सांस्कृतिक जपणूक होण्यासाठी ग. दि. माडगूळकर सभागृह, फिरते वाचनालय, फिरते बालवाचनालय, म्हातोबा गड संवर्धन, 65000 वृक्षारोपण, चांदणी चौक प्रकल्प या विविधांगी उपक्रमासह कोथरूड विधानसभा मतदारसंघातील ग्राम संस्कृतीची जतन होण्यासाठी मतदारसंघातील ६ गावांमध्ये (एरंडवणे हिंगणे कोथरूड बाणेर बालेवाडी पाषाण) यात्रा उत्साहात साजरे करण्यासाठी भरीव मदत केली जात आहे. विधानसभा मतदारसंघातील पूज्य ‘वारकरी’ संप्रदायाचा मान सन्मान वाढवण्यासाठी आषाढी एकादशीच्या अगोदर पालखी सोहळा प्रस्थान करणाऱ्या संप्रदायातील संतांचे ‘संत पूजन’ उपक्रमही राबविला जात आहे. सर्वसामान्य कुटुंबातील व घरकाम करणाऱ्या महिलांसाठी चित्रपट पाहण्याची संधी, लहान मुलांसाठी किल्ले स्पर्धा, सोसायटी नागरिकांसाठी अंतर सोसायटी नाट्य स्पर्धाचे आयोजन करण्यात येते.