नालेसफाई आणि निकृष्ट दर्जाचे रस्ते या मध्ये कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून मोठा भ्रष्टाचार झाल्याचे दिसून येत असून नालेसफाई व रस्ते कॉन्ट्रॅक्टदारांना तात्काळ ब्लॅकलिस्ट मध्ये टाकून त्यांच्यावर योग्य ती कारवाही करावी अन्यथा दालनाबाहेर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार कोथरूड विधानसभेच्या वतीने कोथरूड क्षेत्रीय कार्यलय प्रमुख विजय नायकल यांना देण्यात आला आहे.
कोथरूडमध्ये नुकताच पाऊस झाला व या पावसात रस्त्यात तुडुंबं भरलेले पाणी सर्व कोथरूडकरांना पाहण्यास मिळाले व त्यातूनच रस्त्यावरचे ट्रॅफिक, नुकत्याच केलेल्या रस्त्याची झालेली चाळण, चेंबर्स मधून येणारे घाण पाणी हे सुद्धा कोथरूडकरांनी पाहिले. आपण या सर्व उपयोजना पावसाच्या आगोदर करणे अपेक्षित होत परंतु आपणाकडून व कॉन्ट्रॅक्टदाराकडून हीं सर्व कामे पूर्ण झालेली नाही त्यामुळेच कोथरूडकरांना या सर्व गोष्टींचा नाहक त्रास सहन करावा लागला.
आपण निकृष्ट दर्जाचे केलेल्या रस्त्याचे काम, नालेसफाईचे काम हे आता तरी पूर्ण करून घ्यावे जेणेकरून कोथरूडकरांना अजून अडचणी सहन कराव्या लागणार नाही. अशी मागणी गिरीश गुरनानी अध्यक्ष कोथरूड विधानसभा राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार यांनी केली आहे.