काश्मीर येथील दहशतवादी हल्ल्याचा वारजेतील सकल हिंदू समाजाकडून निषेध

0

काश्मीर येथे दहशतवाद्यांनी धर्म विचारून केलेल्या निष्पाप हिंदू पर्यटकांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी वारजेतील हिंदू नागरिक मोठ्या संख्येने बुधवार दिनांक 23 एप्रिल 2025 ला संध्याकाळी 6.30 वाजता एकत्र आले आणि देशभक्तीपर घोषणा, गीते म्हणून या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यात आला. जमलेल्या नागरिकांनी या दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात सरकारने कठोर कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी महिला आणि तरुणही मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. हिंदू समाजाने एकत्र येऊन दहशतवाद्यांनी धर्म विचारून केलेल्या या हत्येचा ठिकठिकाणी निषेध करावा असे आवाहन यावेळी करण्यात आले. कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते श्री. नवनाथशेठ गुंडाळ पाटील यांनी मरण पावलेल्या निष्पाप हिंदू पर्यटकांना श्रद्धांजली म्हणून दोन शब्द सांगितले आणि हिंदू समाजाने आता तीव्र प्रतिकार करण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

कार्यक्रमाच्या शेवटी 2 मिनिटे मौन पाळून सर्व नागरिकांनी मृत झालेल्या निष्पाप हिंदू पर्यटकांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी बजरंग दल वारजेचे प्रखंड मंत्री श्री. अनंतजी वांजळे, बजरंग दल संभाजी भागाचे धर्मप्रसार प्रमुख श्री. चेतनजी शेळके, राजे शिवराय प्रतिष्ठान व शिवतेज मित्रमंडळ वारजेचे संस्थापक अध्यक्ष ऍड. रणजितजी टेमघरे आणि विविध गणेशोत्सव मंडळ, शिवजयंती मंडळाचे तरुण कार्यकर्तेही उपस्थित होते.