वारजे (प्रतिनिधी) अतुल नगर वाराणसी सोसायटी येथील युरो किड्स प्री स्कूलचे उत्साहवर्धक वार्षिक स्नेह संमेलन साजरे करण्यात आले. या संमेलन मध्ये विविध सांस्कृतिक व पारंपरिक कार्यक्रमांचा त्यामध्ये समावेश होता. कार्यक्रमाचे उद्घाटन माजी महापौर अंकुश अण्णा काकडे यांच्या हस्ते झाले. संचालिका माधुरी गुरनानी आणि प्राचार्य डॉ. श्रुती तापाडिया यांनी अनमोल मार्गदर्शन करून कलात्मक प्रतिभेचे उल्लेखनीय प्रदर्शन घडवून आणले.
यावेळी लहान मुलांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. त्यांनी सादर केलेल्या कला गुणांना उपस्थित श्रोत्यांनी दाद दिली.
कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.