‘पहलगाम’चा वार जिव्हारी; PM मोदींनी ‘सौदी’चा दौरा आटोपला; मोठा निर्णय? सुरक्षा समितीची बैठक बोलावली

0

जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी (ता.22) भीषण दहशतवादी हल्ला करण्यात आला आहे. यावेळी धर्म विचारत दहशतवाद्यांनी थेट पर्यटकांनाच लक्ष्य केलं आहे. यावेळी त्यांनी 40 ते 50 फायर करण्यात आल्याची माहिती आहे. आता याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या हल्ल्याची गंभीर दखल घेत सौदी अरेबियाचा दौरा आटोपता घेतल्याची माहिती समोर येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बुधवारी(ता.23) पहाटे पाचच्या दरम्यान भारतात दाखल होण्याची शक्यता आहे. या जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे मोदींनी नियोजित वेळेपूर्वीच यूएईचा दौरा आटोपता घेतला आहे. त्यामुळे रात्री बुधवारी(ता.22) मध्यरात्रीच पंतप्रधान मोदी भारताकडे रवाना होणार असल्याची माहिती आहे.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

सौदी अरेबियाच्या सरकारने आयोजित केलेल्या डिनरलाही पंतप्रधान मोदी उपस्थित राहिले नाहीत. बुधवारी पहाटे नरेंद्र मोदी पाच वाजता दिल्लीत दाखल होणार आहेत. या दहशतवादी हल्ल्यानंतर मोदींनी कॅबिनेट सुरक्षा समितीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत कॅबिनेट सुरक्षा समिती आणि तिन्ही सैन्याच्या प्रमुखांसोबतही मोदी सुरक्षेची आढावा घेणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये चर्चा होणार आहे. पहलगाम येथील हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्याशी फोनवरुन चर्चा केली होती. यानंतर शाह यांना श्रीनगरला पाठवण्यात आलं होतं. त्यानंतर आता मोदींनी सौदी अरेबियाचा दौरा आटोपता घेतल्याची मोठी माहिती समोर आला आहे.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये भीषण दहशतवादी हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात तब्बल 28 पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तसेच या हल्ल्यात अनेकजण जखमी झाले आहेत. हा हल्ला पहलगाममधील अनंतनाग जिल्ह्यातील बैसरन खोऱ्याच्या वरच्या बाजूला टेकड्यांवर फिरण्यासाठी गेलेल्या पर्यटकांवर दहशतवाद्यांनी घडवून आणला.

कोणालाही सोडणार नाही…!

पंतप्रधान मोदींनी या दहशतवादी हल्ल्याच्या घटनेवर प्रतिक्रिया देत कडक इशाराही दिला आहे.’एक्स’वर केलेल्या पोस्टमध्ये ते म्हणतात,जम्मू-काश्मीरच्या पहलगामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मी तीव्र निषेध नोंदवतो. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले, त्यांच्याबद्दल माझ्या संवेदना आहेत.जखमी लोक लवकरात लवकर बरे व्हावेत अशी मी प्रार्थना करत असल्याच्या भावनाही त्यांनी व्यक्त केल्या.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

तसेच पीडित लोकांना शक्य तितकी सर्व मदत पुरवली जात आहे. या घृणास्पद कृत्यामागील लोकांना शिक्षा होईल, त्यांना सोडले जाणार नाही! त्यांचा नापाक अजेंडा कधीही यशस्वी होणार नाही. दहशतवादाविरुद्ध लढण्याचा आपला निर्धार दृढ आहे आणि तो आणखी मजबूत होईल अशी ग्वाहीही मोदींनी यावेळी दिली.