वाल्मिक कोर्टात म्हणाला, खून आणि खंडणीशी माझा संबंध नाही, धनंजय देशमुख संतप्त होत म्हणाले…

0
2

बीड : खून आणि खंडणी प्रकरणात माझा सहभाग नसल्याने मला दोषमुक्त करा, अशी मागणी सरपंच हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडने केली. देशमुख खुनात माझ्या विरोधात पुरावा नाही. सहभाग असल्याचेही सिद्ध होत नाही. त्याशिवाय, मी खंडणी मागितल्याचेही समोर आले नाही, असे कराडने आपल्या दोषमुक्तीच्या अर्जात म्हटले आहे. तुरुंगातून बाहेर येण्यासाठी वाल्मिकने ही चाल खेळल्याचे बोलले जाते. पुढील सुनावणीत यासंबंधी अधिक विस्तृतपणे न्यायालयात म्हणणे मांडले जाईल, असे वाल्मिक कराडच्या वकिलांनी सांगितले.

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात बीडच्या जिल्हा व सत्र न्यायालयात गुरुवारी सुनावणी झाली. जिल्हा न्यायाधीश व्यंकटेश पाटवदकर यांच्यासमोर सुनावणी संपन्न झाली. वाल्मीक कराडचे वकील विकास खाडे न्यायालयात उपस्थित होते तर विशेष सरकारी ॲड.वकील उज्वल निकम आणि त्यांचे सहकारी वकील ॲड. बाळासाहेब कोल्हे हे देखील न्यायालयात दाखल होते. धनंजय देशमुख देखील न्यायालयात युक्तिवाद ऐकण्यासाठी आले होते.

अधिक वाचा  संविधानाच्या माध्यमातून पंचशीलेला कायद्याचे अधिष्ठान प्राप्त झाले आहे – विनोद मोरे

देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना जेलमध्ये व्हीआयपी ट्रिटमेंट

वाल्मिक कराडच्या दोषमुक्तीच्या अर्जावर धनंजय देशमुख यांनी संताप व्यक्त केला. “गुन्हा केला त्याचा आरोपींना कोणताही पश्चाताप दिसत नाही. त्यांच्या चेहऱ्यावरती थोडीही भीती दिसत नाही. यावरून स्पष्ट दिसत आहे की जेलमध्ये त्यांना कशी वागणूक मिळते”, असा आरोप करीत आरोपींना जेलमध्ये व्हीआयपी ट्रिटमेंट मिळत असल्याची शंका धनंजय देशमुख यांनी अप्रत्यक्षरित्या व्यक्त केली.

वाल्मिकला वाचविण्यासाठी दुर्दैवाने वकिलांची फौज उभी

वाल्मीक कराड यांच्या वकिलांनी आमचा या गुन्ह्याशी संबंध नाही असे म्हणत डिस्चार्ज अॅप्लिकेशन दिले आहे. त्यावरतीही धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली. “वाल्मिक कराडला वाचविण्यासाठी वकिलांची फौज उभी केली जात आहे. मात्र तपासी यंत्रणेकडे वाल्मीक कराडचा या खंडणी आणि खून प्रकरणात काय सहभाग आहे, याचे पुरावे आहेत. हे पुरावे 24 तारखेला दिले जातील. आरोपींना फासावर लटकेपर्यंत आम्ही पाठपुरावा सोडणार नाहीत”, असे देशमुख म्हणाले.

अधिक वाचा  राज्यात ओबीसी उपसमिती काय काम करणार?; उपसमितीची कार्यकक्षाही निश्चित झाली फडणवीसही सरसावले

आरोपींना एकत्र येऊन पुन्हा काहीतरी प्लॅनिंग करायचं असेल

“खून प्रकरणातील दुसरा मुख्य आरोपी विष्णू चाटे हा लातूर जेलमधून बीडमध्ये शिफ्ट करा अशी मागणी करीत आहे. त्यांना एकत्रित येऊन पुन्हा काही प्लॅनिंग करायचे असेल”, असा संशय देखील धनंजय देशमुख यांनी व्यक्त केला.