देशात 7 सायक्लोनिक सर्क्युलेशन्स सक्रीय; बंगाल उपसागरात कमी दाबाचा पट्टा पुन्हा महाराष्ट्राला धोका? 8 जिल्ह्यांवर गारपिटीचं संकट

0

गेल्या 24 तासांमध्ये देशभरात हवामानाने वेगवेगळे रंग दाखवले. बिहारसह अनेक भागांत मुसळधार ते अती मुसळधार पावसाची नोंद झाली असून काही ठिकाणी 12 सेंटीमीटरपर्यंत पाऊस पडल्याचे हवामान विभागाने सांगितले. वादळी वाऱ्यांमुळे पूर्व आणि पश्चिम बंगालमध्येही जोरदार पाऊस झाला. दरम्यान, उष्णतेच्या लाटांमध्ये थोडीशी घट झाली असली, तरी राजस्थानच्या अनेक भागांत ती कायम राहिली. तसेच, गुजरात, दक्षिण हरियाणा, दिल्ली आणि मध्य प्रदेशातील काही भागांमध्ये देखील उष्णतेचे चटके जाणवले. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात उष्ण हवेची स्थिती राहिली.

उत्तर-पश्चिम भारत, पूर्व भारत आणि ईशान्य राज्यांत वादळी वाऱ्यांसह जोरदार मेघगर्जनेसह वीजांचे प्रमाण वाढले. पूर्व उत्तर प्रदेश, दक्षिण हरियाणा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि मेघालयमध्ये गारपीट झाली. देशाच्या बहुतेक भागांत थंड वाऱ्यांची वीजेसह सक्रियता दिसून आली. सध्या देशात सात सायक्लोनिक सर्क्युलेशन्स सक्रीय आहेत. हे सर्क्युलेशन्स दक्षिण पाकिस्तान, पश्चिम राजस्थान, पंजाब, मध्य प्रदेश, बिहार, बांगलादेश, आसाम आणि अरुणाचल प्रदेशाच्या परिसरात आहेत. याशिवाय, पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रीय आहे, जो पुढील 24 तासांत आणखी कमकुवत होण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

महाराष्ट्रात अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यांमध्ये गारपिटीचं संकट आहे. पुढचे तीन ते चार दिवस वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये 40-50 किमी ताशी वेगाने वारे वाहणार आहे. विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. लातूर, धाराशीव जिल्ह्यांमध्ये हलक्या स्वरुपाचा पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

पावसाच्या या अचानक आगमनामुळे शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच विजेच्या गडगडाटामुळे विद्युत पुरवठ्यावर तात्पुरता परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे शेतकरी, वाहनचालक आणि नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी. पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरात सध्या कमी दाबाचा पट्टा सक्रीय झाला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, हा सिस्टम पुढील २४ तासांत अधिक कमकुवत होण्याची शक्यता आहे. मात्र त्याचा परिणाम महाराष्ट्रात काही भागांवर जाणवण्याची दाट शक्यता आहे.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

या हवामान प्रणालींच्या परिणामस्वरूप, उत्तर-पश्चिम भारतात आज आणि उद्या वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे. यामुळे उष्णतेच्या लाटेपासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. ईशान्य भारतात देखील पुढील चार ते पाच दिवस विजांसह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काल गुजरातच्या सौराष्ट्र भागात सर्वाधिक 45.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राजस्थान, मध्य प्रदेश, हरियाणा, मध्य महाराष्ट्रात तापमान 42 ते 44 अंशांच्या दरम्यान होते. मात्र, पुढील तीन दिवसांत तापमानात घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

आज जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमध्ये गारपीट, वीजा आणि धुळीच्या वादळाची शक्यता आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि ईशान्य राज्यांतही वादळी हवामान राहणार आहे. केरळ आणि तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. 14 एप्रिलपासून पश्चिम राजस्थानात उष्णतेच्या लाटेचा नवा स्पेल सुरू होण्याची शक्यता असून 16 तारखेला त्याचा प्रभाव पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि पश्चिम मध्य प्रदेशात जाणवेल.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा