संत तुकाराम कारखाना नानासाहेब नवले पुन्हा विजयी पण मतांची ही आकडेवारी अन् गोळा बेरीज बनली धोक्याची घंटा?

0

संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याची निवडणूक संस्थापक अध्यक्ष नानासाहेब नवले यांनी विजय मिळवला असला तरी सुद्धा संपूर्ण मतदानावरती लक्ष दिल्यानंतर एक प्रामुख्याने एक गोष्ट लक्षात येत आहे ती म्हणजे एकूण 57 मतदान केंद्रापैकी सुमारे 10%(१०) मतदान केंद्रावर संस्थापक अध्यक्ष नानासाहेब नवले यांच्यापेक्षा अन्य उमेदवाराला जास्तीची मते मिळाली आहेत तर एकूण झालेल्या मतदानामध्ये ही सुमारे 10% (९९१) सभासदांनी संस्थापक अध्यक्ष नानासाहेब नवले यांना मत देण्यास नकार दिला आहे. वरकरणी संपूर्ण निवडणूक संस्थापक अध्यक्ष नानासाहेब नवले यांच्या मार्गदर्शनाखाली लढवण्यात आल्याचे सांगण्यात आले असले तरीसुद्धा प्रत्यक्षात मात्र प्रत्येक गटांनुसार आपापली गेली ते जुळवण्यातच सर्व मान्यवरांनी धन्यता मानली असल्याचे जाणवत आहे.  सर्वच उमेदवार एकाच पॅनलचे निवडून आल्यामुळे कारखान्यावर नानासाहेब नवले यांचेच वर्चस्व असल्याचे वरवर सिद्ध झाले तरीही संपूर्ण कारखान्याचे कार्यक्षेत्रात असलेल्या विद्यमान व माजी आमदार यांनी सुचवलेली नावे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब नवले यांच्या बाजूनेच जातील याबाबत शंका निर्माण झाली आहे. त्यामुळे संचालक मंडळाच्या नियुक्तीच्या अन् निवडीच्या प्रक्रियेमध्ये मोठे विघ्न निर्माण झाले? अशी चर्चा सुरू झाली आहे.

सर्वपक्षीय श्री संत तुकाराम शेतकरी विकास पॅनेलचे मतदानापूर्वीच २१ पैकी १८ उमेदवार हे बिनविरोध निवडून आल्यामुळे अवघ्या 3 जागांसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये संस्थापक नानासाहेब नवले यांना ८५२४ विक्रमी मते मिळाली तर सहकारी दत्तात्रय जाधव यांना ८३८० मते प्राप्त झाली. स्थानिक आणि खुल्या गटांमध्ये ओबीसी उमेदवार दिल्याच्या मुद्द्यावरती निवडणुकीच्या रिंगणात अपक्ष उभे राहिलेल्या बाळासाहेब भिंताडे यांना २५०५ मते मिळाल्याने चेतन भुजबळ यांना ७१८९ मते मिळाली. मुळात संस्थापक अध्यक्ष माजी खासदार विदुरा उर्फ नानासाहेब नवले यांना वार्धक्यामध्ये त्रास होऊ नये ज्येष्ठत्वाचा मान राखला जावा या हेतूने सुरुवातीपासूनच संबंधित निवडणूक निरोध करण्याचे आराखडे बांधण्यात आले होते. प्रत्यक्ष झालेल्या मतदानामध्ये सर्वाधिक मते त्यांना मिळेल अशी अपेक्षा असताना तसे घडले परंतु मतदान केंद्रानुसार जर मतांची आकडेवारी पाहिली तर धक्कादायक समोर येत आहे. ते म्हणजे संपूर्ण सभासदांपैकी 10% मतदारांनी आणि 10% मतदान केंद्रावर संस्थापक अध्यक्ष नानासाहेब नवले यांच्यापेक्षा त्यांच्याच पॅनलच्या अन्य उमेदवाराला (दत्तात्रय जाधव) जास्त मते मिळाली आहेत. मावळचे आमदार सुनील शेळके यांनी या निवडणुकीत दंड थोपटले ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी साद दिली खरी परंतु महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजित पवार यांचे वर्चस्व राखण्यासाठी कार्यक्षेत्रातील सर्व आजी-माजी आमदारांना एकत्र करत अगोदरच सर्वाधिक सभासद बिनविरोध करून आपलं प्राबल्य सिद्ध केले आहे. आत्ता निवडून आलेल्या नवीन संचालक मंडळासमोर ज्या नियुक्त्या जाहीर केल्या जाणार त्यामध्ये त्यांचाच वरचष्मा राहणार हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

मतदान केंद्र              एकूण मतदान     1      (2 नाना)

इंदोरी-अ                         338          278      276

इंदोरी ब.                         339          162         159

कामशेत-                        307         113         106

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

दारुब्रे-व                          311          141          138

वडगांव पाटोळे                 273         151         149

कुरुळी                            256         160       108

शेल पिंपळगांव                 625         213        201

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

चिचोशी                          625         218        209

पिंपळे जगताप                 388         199        193

वढू बु                             625         228        226

बिनविरोध निवडून आलेले संचालक

धैर्यशील रमेशचंद्र ढमाले, यशवंत सत्तू गायकवाड, दत्तात्रय शंकर उभे, ज्ञानेश्वर सावळेराम दाभाडे, बापूसाहेब जयवंतराव भेगडे, संदीप ज्ञानेश्वर काशीद, छबुराव रामचंद्र कडू, भरत मच्छिद्र लिम्हन, उमेश बाळासाहेब बोडके, अनिल किसन लोखंडे, धोंडीबा तुकाराम भोंडवे, विलास रामचंद्र कोतोरे, अतुल अरुण काळजे, ज्योती केशव आरगडे, शोभा गोरक्षनाथ वाघोले, लक्ष्मण शंकर भालेराव, राजेंद्र महादेव कुदळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.