विधिमंडळ समितींच्या नियुक्तीसाठी अजित दादांचं ठरलं! …यांना चार हात लांब ठेवलं, भुजबळांनाही स्थान नाही दिलं,

0
2

मुंबई : विधिमंडळाच्या समितींमध्ये धनंजय मुंडे आणि छगन भुजबळांना अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीकडून कोणतेही स्थान देण्यात आलेले नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाणीवपूर्वक धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ या वादग्रस्त नेत्यांना दूर ठेवल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. शिवाय धनंजय मुंडेंचं रिक्त झालेलं मंत्रीपद अजित पवारांनी स्वतःकडे ठेवल्यामुळे छगन भुजबळ नाराज असल्याच्या देखील चर्चा आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघण्याची चिन्हं दिसत आहेत.

राज्य विधिमंडळाच्या विविध समित्या आणि त्या समित्यांवरील प्रमुखांची नावे नुकतीच जाहिर झाली आहेत. या समितींमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडे आणि ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना डावलण्यात आले. संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी मंत्री धनंजय मुंडेंचे नाव जोडल्यामुळे राष्ट्रवादीला त्याची झळ बसली होती. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने आपली कोअर कमिटी स्थापन केली होती. त्या कमिटीत धनंजय मुंडेंना स्थान दिल्याने मोठ्या प्रमाणात विरोधकांकडून “राष्ट्रवादी गुन्हेगारांना पाठीशी घालते” अशा प्रकराच्या टीकेला सामोरे जावे लागले होते. त्यापार्श्वभूमीवर अजित पवारांनी जाणीवपूर्वक विधिमंडळाच्या गठीत समितींमध्ये धनंजय मुंडेंना चार हात लांब ठेवणेच योग्य समजले.

अधिक वाचा  रुणवाल पॅनोरमा सोसायटीत श्रीचरणी कामगार कवी राजेंद्र वाघ यांच्या कविता सादर 

भुजबळांनाही मंत्रिपदापासून लांब ठेवले

तर, विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान राष्ट्रवादीचे जुने जाणते नेते माजी मंत्री छगन भुजबळ यांना, धनंजय मुंडेंच्या रिक्त झालेल्या मंत्रीपदावर नेमणुक होऊन पुनरुज्जीवन मिळेल अशी आशा असतानाच त्यांचा मोठा अपेक्षा भंग झाला आहे. अजित पवारांनी धनंजय मुंडे यांचं अन्न व नागरी पुरवठा मंत्रीपद स्वतःकडेच ठेवलं. राष्ट्रवादी पक्षाचा ओबीसी नेत्याचा चेहरा म्हणून ख्यातनाम असलेल्या छगन भुजबळांना मंत्रिपदापासून लांब ठेवल्याने भुजबळांच्या समर्थकांमध्ये नाराजी पसरल्याचे पाहायला मिळत आहे. धनंजय मुंडे यांना जाणीवपूर्वक लांब ठेवल्याने कोणत्याही प्रकारचा वाद होणार नाही याची अजित दादांनी पुरेपूर काळजी घेतल्याचे दिसत आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार आगामी काळात आणखी काय निर्णय घेणार हे पाहणं महत्तवाचं ठरणार आहे.

अधिक वाचा  राज्यात ओबीसी उपसमिती काय काम करणार?; उपसमितीची कार्यकक्षाही निश्चित झाली फडणवीसही सरसावले