‘छावा’ची २२ व्या दिवशीही डरकाळीच ऑस्कर विजेत्या ‘RRR’ लाही टाकलं मागे; कमाई ५०० कोटीच्या अगदीजवळ

0

विकी कौशल आणि रश्मिका मंदान्ना यांचा ‘छावा’ हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होऊन २२ दिवस उलटले आहे. या चित्रपटाच्या बंपर कमाईने अनेक सिनेमांना मागे टाकले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट सर्वांचे मन जिंकत आहे. पण या सिनेमाने नव्याने रिलीज झालेल्या सिनेमांना मागे टाकले आहे.

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ हा चित्रपट २२ दिवसांत थिएटरमध्ये हिट झाला आहे. शुक्रवारी ‘छावा’च्या कमाईत मोठी वाढ झाली. ‘छावा’च्या २२ व्या दिवसाच्या कलेक्शनने देशातील चौथ्या क्रमांकाच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या ‘आरआरआर’ चित्रपटाच्या कलेक्शनला मागे टाकले आहे, त्या सिनेमाने तिसऱ्या शुक्रवारी फक्त ४.५ कोटी रुपये कमावले होते.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

आता ‘छावा’ ५०० कोटींच्या अगदी जवळ

सॅकनिल्कच्या अहवालानुसार, ‘छावा’ चित्रपटाने २२ व्या दिवशी ७.२४ कोटी रुपये कमावले आहेत. एकूणच, या चित्रपटाने ४९०.७९ कोटी रुपयांची कमाई केली. याचा अर्थ हा चित्रपट आता ५०० कोटींच्या अगदी जवळ पोहोचला आहे. आता ‘छावा’ सनी देओलच्या ‘गदर २’ ला कधी मागे टाकेल हे याची उत्सुकता सिनेप्रेमींना आहे.

‘छावा’ ने जगभरात किती कमाई केली?

‘छावा’ जगभरात खूप लोकप्रिय झाला आहे. या चित्रपटाने जगभरात ६६८ कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे. जर फक्त परदेशातील कमाईबद्दल बोलायचे झाल्यास तर सिनेमाने ८२ कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

सिनेमाच्या कास्टबद्दल बोलायचे झाल्यास या सिनेमात विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारत आहे. तर रश्मिका मंदानाने महाराणी येसूबाईंची भूमिका साकारलीय. याशिवाय अभिनेता अक्षय खन्नाने औरंगजेबाची भूमिका साकारलीय. छावा सिनेमात संतोष जुवेकर, शुभंकर एकबोटे, मनोज कोल्हाटकर, सुव्रत जोशी, सारंग साठ्ये यांसारख्या मराठी कलाकारांच्याही भूमिका आहेत.