महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी प्रदीप चंद्रन; बहुतांश सेवा विदर्भात पुणे विभागात पहिलांदाच कामाची संधी

0
1

पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्तपद गेल्या अकरा महिन्यापासून रिक्त होते. याठिकाणी अखेर राज्य शासनाने आयएएस अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. मुंबई येथील उद्योग संचालनालयाचे अतिरिक्त विकास आयुक्तपदी कार्यरत असणारे एम. जे. प्रदीप चंद्रन यांची महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदीप चंद्रन हे २०१२ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. ते उद्योग संचालनालयात कार्यरत होते. त्यापूर्वी ते अमरावती येथे आदिवासी विभाग विभागाचे अतिरिक्त आयुक्त, भंडारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, वस्त्रउद्योग विभागाचे आयुक्त, गौन खनिज महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळलेली आहे.

चंद्रन यांची बहुतांश सेवा ही विदर्भात झाली आहे, त्यानंतर त्यांना मुंबईमध्ये नियुक्ती देण्यात आली. पुणे महसूल विभागात त्यांना पहिलांदाच कामाची संधी मिळाली आहे. पुणे महापालिकेत यापूर्वी २०१२ च्या बॅचचे डॉ. कुणाल खेमणार, रवींद्र बिनवडे या दोघांनी अतिरिक्त आयुक्तपदी काम केले आहे. त्यानंतर आता प्रदीप चंद्रन हे देखील त्यांच्याच बॅचचे आहेत.

अधिक वाचा  कोथरूड सर्वपक्षीय गणेश विसर्जन नियोजन समिती; 17वा विसर्जन नियोजन महोत्सव…तोच उत्साह …तोच ध्यास!

पुणे महापालिकेत अतिरिक्त आयुक्त पदाच्या तीन जागा आहेत, त्याठिकाणी खेमणार, बिनवडे आणि विकास ठाकणे हे तिघे कार्यरत होते. त्यांच्या बदलीनंतर पृथ्वीराज बी. पी. यांची नियुक्ती करण्यात आली होती. पण त्यानंतर दोन जागा रिक्त असूनही मार्च २०२४ पासून तेथे कोणत्याही अधिकाऱ्याची नियुक्ती होत नव्हती. यासाठी शहरातील लोकप्रतिनिधींनी शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला होता.

काही दिवसांपूर्वी अपर जिल्हाधिकारी पदावर पदोन्नती झालेले महेश पाटील यांना महापालिकेच्या अपर आयुक्तपदी नियुक्ती देण्यात आलेली आहे. ते अतिरिक्त आयुक्त म्हणूनच काम पाहणार असल्याची चर्चा महापालिकेत आहे. त्यानंतर आता रिक्त असलेल्या एका जागेवर प्रदीप चंद्रन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

अधिक वाचा  पुणे महापालिका प्रभाग रचनेवर हरकतींचा पाऊस; शेवटचा दिवस; उत्तर आणि दक्षिण टोकावरील या प्रभागावर सर्वाधिक हरकती