बीडमधील मारहाणीचे आणखी दोन व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. दरम्यान याप्रकरणी सतीश भोसले नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध सुरु आहे. सतीश भोसले हा आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्याचा आरोप अंजली दमानियांनी केला आहे. एका व्यक्तीला बेदम मारहाण करतानाचा शिरुरमधील धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओत सतीश भोसले हा एका व्यक्तीला मारहाण करताना दिसत आहे. दरम्यान या प्रकरणी सतीश भोसलेसह 4 जणांवर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्हायरल झालेला व्हिडीओ जुना असून 19 फेब्रुवारी रोजी सतीश भोसलेनं आणखी एकाला मारहाण केल्याचा दावा अंजली दमानियांनी केला आहे. तसंच सतीश भोसले हा सुरेश धसांचा कार्यकर्ता असल्याचा आरोपही दमानियांनी केला आहे.
दरम्यान या मारहाणीच्या घटनेनंतर बावी गावातील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत… सतीश भोसलेला अटक करण्याची मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे. सतीश भोसले उर्फ खोक्या भाऊचे अनेक व्हिडीओ सध्या समोर येत आहेत. या व्हिडीओच्या माध्यमातून त्याची पार्श्वभूमी देखील काहीशी गुन्हेगारीची असल्याची दिसत आहे.
एका व्हिडीओत सतीश भोसले उर्फ खोक्या भाऊ कारमध्ये पैसे फेकताना दिसत आहे. दुसऱ्या व्हिडीओत खोक्या भाऊ हा हेलिकॉप्टरमधून उतरताना दिसत आहे. एखाद्या हिरोला देखील लाजवेल अशी खोक्या भाऊ एन्ट्री मारत आहे. तिसऱ्या व्हिडीओत लाईफ हो तो खोक्या भाई जैसी… म्हणत खोक्या भाऊ फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये लग्ज़रियस लाईफ जगतोय..
खोक्या भाई कोण?
– सतीश भोसले बीडच्या शिरूर शहराजवळीस पारधी वस्तीवर राहतो
– सतीश भोसले मित्रांसोबत लॅविश लाईफ जगतो
– गेल्या काही वर्षांपासून सक्रिय राजकारणात सहभाग
– भाजप आमदार सुरेश धस यांचा कट्टर समर्थक
– शिरूर कासार परिसरात सतीश भोसलेची खोक्या पार्टी नावानं दहशत
– गोल्डमॅन म्हणूनही स्थानिक पातळीवर सतीश भोसलेची ओळख
– मारहाणीचा व्हिडिओ समोर आल्यानंतर सतीश भोसले उर्फ खोक्याचे अनेक कारनामे समोरआले आहेत.
सतीश भोसलेनं केलेल्या मारहाणीचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान खोक्या भाईला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी देखील करण्यात येत आहे.