बीड: संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मिक कराडभोवती कायद्याचा फास आता आणखी घट झाला आहे. कराडची संपूर्ण संपत्तीची माहिती घेण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू झाले आहे. वाल्मीक कराडची राज्यभर असलेली कोट्यावधींची संपत्ती जप्त करण्यासाठी एसआयटी कडून हालचाली सुरू झाली आहे. आरोपी वाल्मीक कराडची संपत्ती राज्याच्या बाहेर देखील आहे. कराडच्या नावे आणि पत्नी मंजिली कराड त्याचबरोबर दुसरी पत्नी ज्योती जाधव आणि मुलगा गणेश यांच्या नावावर आहे. वाल्मिक कराडने सन 2020 ते 2024 मध्ये खरेदी केल्याचं समोर आलं आहे.
बीडच्या मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडच्या संपती बाबत माहिती जमा करण्याचे काम सुरू आहे. राज्य आणि राज्याच्या बाहेर वाल्मिक कराडची संपत्ती असल्याचे समोर आले आहे. मात्र ही संपत्ती आता त्याला गमवावी लागणार कां? वाल्मीक कराडने मोठे मोठे प्लॉट, रो हाऊस आणि कोट्यावधी रुपयांची जमीन नेमकी कोणत्या उद्योगांमधून कमवली याची देखील चौकशी होणार आहे. वाल्मीक कराडची संपत्ती जप्त करण्यासाठी एसआयटीने आता बीडच्या न्यायालयामध्ये अर्ज देखील केला असल्याची चर्चा आहे. मात्र याला अधिकृत दुजोरा मिळाला नाही.
वाल्मिक कराडची संपत्ती तरी किती?
1)आरोपी वाल्मिक कराडची पुणे, लातूर, परळी, केज इतर ठिकाणी रो हाऊस
2) केजमध्ये 2500 चौरस फुटांचा प्लॉट आणि एक बंगला किंमत 1 कोटी 69 लाख रुपये.
3) बीडच्या दगडवाडी मध्ये शेत जमीन किंमत 48 लाख 26 हजार रुपये.
4) मौजे तडोळी येथे 12 एकर शेत जमीन 20 लाख 27 हजार रुपये.
5) परळी रोडवर अंबाजोगाई 380 चौ. मी. बांधकाम
6) अंबाजोगाई मध्येच 419 चौ. मी. बांधकाम किंमत कोट्यावधी रुपये.
7) याच वाल्मीक कराडचे बीडच्या दगडवाडी स्टोन क्रेशर युनिट
8) दगडवाडी गावात 48 लाखांची शेत जमीन
9) परळीतील वडगावात साडेचार एकर शेत जमीन किंमत 13 लाख रुपये.
10) वडगावातच आणखी एक प्लॉट किंमत दीड लाख रुपये.
11) बीडच्या सिरसाळा गावात 581 चौ.मी खुला प्लॉट किंमत साडेसात लाख रुपये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार कराडने कोट्यावधी रुपयांची संपत्ती कमवली आहे. इतकी संपत्ती कराडकडे कुठून आली कुठून आणि त्याचा उद्योग तरी काय आहे? यावर देखील आता प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहे. कराडसह पत्नी मंजिली कराड, ज्योती जाधव आणि मुलगा गणेश कराडच्या नावे आहे मात्र या संपत्ती वरती आता टाच येणार ? हे पाहण महत्वाचं असेल.