इंग्लंड सलामीवीर बेन डकेटचं शतक, तर जो रूटची फिफ्टी ! द्रविड-सचिनचा २६ वर्षांपूर्वीचा विक्रमही मोडला

0
1

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघात शनिवारी (२२ फेब्रुवारी) होत आहे. या सामन्यात इंग्लंडला शानदार सुरुवात मिळाली असून त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध मोठी धावसंख्या उभारली आहे. सलामीवीर बेन डकेटने शतकी खेळी केली, त्याला जो रुटचीही चांगली साथ मिळाली.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलियाने गोलंदाजीची सुरुवातही चांगली केली होती. सलामीवीर फिल सॉल्टला दुसऱ्याच षटकात १० धावांवर बेन ड्वारशुईने बाद केले. त्याचा अफलातून झेल ऍलेक्स कॅरेने पकडला.

त्यानंतर ६ व्या षटकात ड्वारशुईनेच जॅमी स्मिथ यालाही कॅरेच्याच हातून झेलबाद केले. पण यानंतर सलामीवीर बेन डकेटला जो रुटची साथ मिळाली. या दोघांनी खराब चेंडूंचा समाचार घेत मोठ्या भागीदारीकडे वाटचाल केली.

अधिक वाचा  कोथरूड सर्वपक्षीय गणेश विसर्जन नियोजन समिती; 17वा विसर्जन नियोजन महोत्सव…तोच उत्साह …तोच ध्यास!

त्यांनी या भागीदारी दरम्यान त्यांची अर्धशतकेही पूर्ण केली. त्यांची दीडशतकी भागीदारीही झाली. त्यामुळे इंग्लंडने ३१ षटकातच २०० धावांचा टप्पा गाठला. पण ३१ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर ऍडम झाम्पाने जो रुटला ६८ धावांवर पायचीत पकडले, त्यामुळे त्याची डकेट सोबतची भागीदारी तुटली.

रुट आणि डकेट यांच्यात १५८ धावांची भागीदारी झाली. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध केलेली ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च भागीदारी ठरली. त्यांनी राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकरच्या विक्रमाला मागे टाकले आहे.

द्रविड आणि सचिन यांनी १९९८ सालच्या पहिल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ढाकामध्ये १४० धावांची भागीदारी केली होती. तसेच मार्कस ट्रेस्कोथिक आणि मायकल वॉन यांनीही २००४ मध्ये बर्मिंगहॅम येथे खेळताना ऑस्ट्रेलियाविरुद्ध १४० धावांची भागीदारी केली आहे.

अधिक वाचा  ओबीसींसाठी उपसमिती गठीत, चंद्रशेखर बावनकुळे अध्यक्ष छगन भुजबळ, पंकजा मुंडेंसह बडे मंत्री सदस्य

या यादीत अव्वल क्रमांकावर ओएन मॉर्गन आणि बेन स्टोक्स आहेत. मॉर्गन आणि स्टोक्स यांनी २०१७ चॅम्पियन्स ट्रॉफीध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध १५९ धावांची भागीदारी केली होती. त्यांना विक्रम मोडण्यासाठी डकेट आणि रुट यांना केवळ २ धावा कमी पडल्या.

डकेटचं शतक

दरम्यान, डकेटने रुट बाद झाल्यानंतर लगेचच शतक झळकावले. त्याने ९५ चेंडूत त्याचे शतक केले. हे त्याचे तिसरे वनडे शतक आहे, तर ऑस्ट्रेलियाविरुद्धचे दुसरे शतक आहे. तसेच इंग्लंडसाठी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये शतक करणारा तो पाचवा इंग्लंडचा खेळाडू आहे.

यापूर्वी जो रुट, मार्कस ट्रेस्कोथिक, अँड्र्यू फ्लिंटॉफ आणि बेन स्टोक्स यांनी इंग्लंडसाठी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये शतके केली आहेत.

अधिक वाचा  राज्य मंत्रीमंडळ बैठकीत 14 निर्णय; मुंबई- ठाणे नविन मेट्रो मार्गिका, पुणे-लोणावळा हा निर्णय, सर्व जाणून घ्या! 

१३३ नाबाद धावा – जो रुट – विरुद्ध बांगलादेश, २०१७

११९ धावा – मार्कस स्ट्रेस्कोथिक, विरुद्ध झिम्बाब्वे, २००२

१०४ धावा – अँड्र्यू फ्लिंटॉफ, विरुद्ध श्रीलंका, २००४

१०४ धावा – मार्कस स्ट्रेस्कोथिक, विरुद्ध वेस्ट इंडिज, २००४

१०२ नाबाद धावा – बेन स्टोक्स, विरुद्ध ऑस्ट्रेलिया, २०१७

१०० नाबाद धावा – बेन डकेट, विरुद्ध ऑस्ट्रेलिया, २०२५