सकाळी 7 वाजेपर्यंत किती कोटी लोकांनी पवित्र स्नान केलं, स्पेशल ट्रेन रद्द होणार का?

0

प्रयागराज येथे सुरु असलेल्या महाकुंभ मेळ्यात आज चेंगराचेंगरीची घटना घडली. आज मौनी अमावस्या शाही स्नानाचा दिवस असल्याने प्रयागराजमध्ये प्रचंड गर्दी झाली आहे. प्रचंड गर्दी झाल्याने चेंगराचेंगरी झाली. परिस्थितीवर आता नियंत्रण मिळ्वण्यात आलं असून कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात आता स्नान पुन्हा सुरु झालय. स्थिती आता नियंत्रणात आहे. संगमावर स्नान सुरु आहे. भाविक मोठ्या आस्थेने डुबकी मारण्यासाठी येत आहेत. लोकांनी संगमावर गर्दी करु नये, त्याऐवजी जिथे आहेत तिथे स्नान करावं, असं आवाहन करण्यात येतय. मौनी अमावस्येला घाटांवर पवित्र डुबकी मारण्यासाठी भाविक येत आहेत.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

उत्तर प्रदेश सरकारनुसार आज सकाळी 6 वाजेपर्यंत 1.76 कोटी लोकांनी घाटांवर स्नान केलं आहे. 28 जानेवारीपर्यंत एकूण 19.94 कोटी लोकांनी स्नान केल्याची माहिती आहे. शाही स्नानाचा दिवस असल्याने प्रयागराजमध्ये आज विविध भागातून 360 पेक्षा जास्त ट्रेन्स चालवण्याच रेल्वेच नियोजन आहे. सध्या तरी कुठलीही स्पेशल ट्रेन रद्द करण्याचा प्लान नाहीय असं रेल्वेकडून सांगण्यात आलय.

डुबकी मारण्याची माझी 108 वी वेळ

महाकुंभमध्ये एकीकडे चेंगरा चेंगरी झाल्याची बातमी आहे, त्याचवेळी दुसऱ्याबाजूला पुन्हा शाही स्नान सुरु झालं आहे. लोक शांततेत शाही स्नान करत आहेत. स्नान सुरु असल्याचे व्हिडिओ समोर आलेत. मौनी अमावस्येला महाकुंभमध्ये त्रिवेणी संगमावर स्नान सुरु आहे. संगम त्रिवेणी येथे आलेल्या एका महिलेने सांगितलं की, “ती 5 जानेवारीपासून महाकुंभमध्ये आहे. ती दिल्लीवरुन आली आहे. मी रोज संगमावर स्नान करते” “आज संगमावर डुबकी मारण्याची माझी 108 वी वेळ आहे. चांगलं नियोजन आहे. कुठली अडचण नाहीय. पोलीस सुद्ध सहकार्य करतातय” असं ही महिला म्हणाली.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

संगमावर स्नानाचा हट्ट धरु नये

आध्यात्मिक गुरु देवकीनंदन ठाकूर म्हणाले की, “मी संगम घाटावर गेले नाही. कारण तिथे भरपूर गर्दी होती. आज मी हजारो लोकांसोबत भगवती गंगेच्या किनाऱ्यावर स्नान केलं. मी लोकांना अपील करतो की, त्यांनी संगमावर स्नानाचा हट्ट धरु नये. आज प्रयागराजमध्ये जिथे गंगा-जमुना आहेत, तिथे स्नान केल्यास अमृत प्राप्ती होईल”