पुण्यात वैशाली हॉटेलजवळ आकानं…; वाल्मिक कराडच्या प्रॉपर्टीचे धस यांच्याकडून धक्कादायक खुलासे

0
6

बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील अनेक प्रकरणांवर सध्या भाजप आमदार सुरेश धस हे अनेक धक्कादायक खुलासे करत आहेत. नुकतेच त्यांनी पैठण इथं जाहीर सभेत या प्रकरणाशी संबंधीत संशयीत आरोपी वाल्मिक कराड याच्या गुंतवणुकींचा पाढाच वाचला. यामध्ये सर्वाधिक पैसा हा पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज रोडवर आणि हडपसरमधील अॅमनोरा पार्क इथं मोठी गुंतवणूक केल्याचं तपशीलवार सांगितलं.

सुरेश धस म्हणाले, “पुण्यात एफसी रोडवर वैशाली हॉटेलच्या पलिकडं बिल्डर सुशील पाटील यानं कमर्शिअल कॉम्प्लेक्स उभा केलाय यात छाजेड पार्टनर आहेत. तिथं आका यानं ७ दुकानं बुक केले आहेत. इथं एका दुकानाची किंमत ५ कोटी रुपये आहे. यामध्ये ६०१, ६०२, ६०३, ६०४, ६०५, ६०६, ६०७ नंबरची ही दुकानं आहेत. यामध्ये ६०८ क्रमांकाचं दुकानं हे विष्णू चाटेची बहीण सोनवणे यांच्या नावावर आहे.

अधिक वाचा  राज्यव्यापी OBC नेते आक्रमक थेट मराठा आरक्षणाचा शासन निर्णय फाडला, राज्यव्यापी आंदोलनही करणार 

विष्णू चाटे हा संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या खटल्यातील आरोपी आहे. आकाची दुसरी पत्नी जाधव यांच्या नावावर तीन दुकानं तर यात वाल्मिक आका याच्या नावावर ४ दुकानं आहेत. म्हणजे एकूण ३५ कोटी रुपयांची प्रॉपर्टी आहे. त्यात विष्णू चाटेचा एक मिळून ४० कोटी रुपये होतात. या कॉम्प्लेक्समध्ये खरंतर आकानं त्या बिल्डरला संपूर्ण टेरेसच मागितलं होतं, ३५ कोटी रुपयांत रुफटॉप हॉटेलसाठी. पण छाजेड आणि पाटील म्हणाले आम्हाला नाही द्यायचं म्हणून ते आकाच्या तावडीतून वाचलं.

त्यानंतर पुण्यातील हडपसर भागातील मगरपट्टा भागातील अमनोरा पार्क इथला अन्ड्रोना टॉवरमध्ये एका फ्लॅटची किंमत आहे १५ कोटी रुपये आहे. तिथं त्यांनी एक आख्खा फ्लोअरच विकत घेतला आहे. हा फ्लोअर वाल्मिक कराडच्या ड्रायव्हरच्या नावावर आहे. ड्रायव्हरकडून भाड्यानं रहायचं अॅग्रीमेंटदेखील करुन घेतलं, त्याची किंमत होती ७५ कोटी रुपये. म्हणजे या दोन चौकशांमध्येच वाल्मिक कराड १०० कोटींच्या पुढे गेले, म्हणजेच आता ईडीच्या दरबारात गेले.

अधिक वाचा  रोहित शर्माने 2० किलो वजन कमी कसं केलं, संपूर्ण दिवसाचा दिनक्रम अन् आहार

दरम्यान, मावळ प्रांतात या आकानं गोरख दळवी आणि अनिल आप्पा दळवी हे बापलेक ठेवलेत. कुठे काही विकायला सापडलं की त्यांना येऊचद्या म्हणतात. एखाद्यावेळी ते अंबानींना देखील मागे टाकतील, अशा शब्दांत सुरेश धस यांनी वाल्मिक कराडनं केलेल्या गुंतवणुकीचा खुलासा केला.