धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडच्या पैसे आणणाऱ्या गाड्या पकडल्या; विधानसभेवेळी परळीत काय घडलं? Video व्हायरल

0

विधानसभा निवडणुकीत परळी मतदारसंघात यावेळी गोंधळ झाला होता. अनेक केंद्रांवरील वादग्रस्त व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या प्रकरणात अडीच महिन्यानंतर मुंडेंचे निकटवर्तीयांवर गुन्हा देखील झाला. परंतु आता एका पोलिस अधिकाऱ्याने विधानसभावेळी कशा पैश्यांच्या पेट्य येत होत्या, कशी दहशत होती? याविषयी चक्क एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. बीड सायबरचे पोलिस उपनिरीक्षक रणजीत कासले निलंबित होताच त्यांनी प्रकरणी तोंड उघडले असून धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडवर गंभीर आरोप केले आहेत.

रणजीत कासले यांच्या निलंबनाचे आदेश निघताच कासले यांनी वेगवेगळे करत पोलीस अधिकारी तसेच विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांवर देखील आरोप करत या सगळ्यांची चौकशी करावी अशी मागणी केली. तसेच निलंबन का केले यासह अनेक धक्कादायक गोप्यस्फोट या व्हिडिओमधून केले आहेत. कासले यांच्या निलंबनाच्या आदेश नवनीत कावत यांनी काढले आहेत.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

धनंजय मुंडे, वाल्मिक कराडच्या अनेकदा पैसे आणणाऱ्या गाड्या पकडल्या

रणजीत कासले यांनी निलंबीत केल्याचे कारण सांगताना आपल्या एका व्हिडीओमध्ये म्हणाले, मी धनंजय मुंडे, वाल्मिक कराडच्या अनेकदा पैसे आणणाऱ्या गाड्या पकडल्या होत्या. त्यामुळे विधानसभा निवडणुकीवेळी आधी परळीत बंदोबस्त लावला. पण, पेट्या येणार त्यावेळीच माझ्याकडून बंदोबस्त काढला आणि आरक्षित ठेवलं. एवढच नाही तर त्याच दिवशी संत बाळूमामा कन्स्ट्रक्शन खात्यातून माझ्या पगाराच्या खात्यात 10 लाख रु. आले ते का आले?, याचा मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तपास करावा.

तडजोड करत पैसे घेत असल्याचा व्हिडीओ समोर

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

बीड पोलीस दलात आता एका पीएसआयचे निलंबन करण्यात आले आहे. रणजीत कासले असे या पीएसआयचे नाव असून परराज्यात तपासाकरता गेले असता तडजोड करत पैसे घेत असल्याचा व्हिडिओ समोर आला होता. यानंतर हा विषय राज्यस्तरापर्यंत पोहोचला होता. या प्रकरणाची चौकशी करत आता कासले यांच्या निलंबनाच्या आदेश नवनीत कावत यांनी काढले आहेत.

कोण आहेत रणजीत कासले?

गेल्या 19 ते 20 वर्षा पासून पोलिस दलात नोकरी

कॉन्स्टेबल पासून खात्यांतर्गत पदोन्नती त्यामुळे पोलीस उप निरीक्षक पदावर सद्या कार्यरत

संभाजीनगर ग्रामीण येथेही कार्यरत असताना अँटीकरप्शन मध्ये एक वेळ कारवाई.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

बीड जिल्ह्यामध्ये सहा वेळावेगवेगळ्या ठिकाणी बदली झाली.

या अगोदरही वरिष्ठावर गंभीर आरोप केल्याने वादग्रस्त..

ज्या ज्या ठिकाणी कार्यरत त्या त्या ठिकाणी वरिष्ठावर आरोप करत वादग्रस्त.

बीड सायबर क्राईम ब्रांच मध्ये तीन महिनापूर्वी रुजू

वरिष्ठांची परवानगी न घेता पर राज्यात गुजरात मध्ये तपास कामी गेले.

आरोपीकडून पैशाची मागणी करत तडजोड करतानाचे पुरावे,

व्हिडिओ वरिष्ठांकडे राज्य स्तरावर चौकशी अहवाल मिळाल्यानंतर निलंबनाची कारवाई.