बीडमधील सरपंच संतोष देशमुख अपहरण करुन हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली. त्यानंतर संपूर्ण बीड जिल्ह्यात या घटनेची पडसाद उमटू लागले आहेत. मस्साजोग येथील ग्रामस्थांनी देशमुख यांच्या हत्येचा लवकरात लवकर तपास करुन आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. संतप्त नागरिकांनी रस्ता रोको केला आणि बसची तोडफोड देखील करण्यात आली. दरम्यान, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी या आंदोलनाला भेट दिल्यानंतर जमाव शांत झाल्याचे पाहायला मिळाले. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर काल दिवसभर केज आणि मस्साजोग या ठिकाणी हिंसक आंदोलन झालं. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी प्रशासनाशी बातचीत केली आणि अखेर काल रात्री दहा वाजता आंदोलन मागे घेण्यात आलं, त्यानंतर संतोष देशमुख यांच्यावर अंत्यसंस्कार झाले..दरम्यान, हत्या झालेले संतोष देशमुख कोण होते? जाणून घेऊयात…
संतोष पंडितराव देशमुख
वय 45 वर्ष,
मस्साजोग ,
ता केज जि बीड.
राजकीय कारकीर्द
2012 ते 2017 उपसरपंच
2017 ते 2022 देशमुख यांच्या पत्नी सरपंच
2022 ते आजपर्यंत संतोष देशमुख सरपंच
संतोष देशमुख यांच्याकडे मस्साजोग या गावची उपसरपंचकी आणि सरपंचकी होती. सुरुवातीच्या टर्ममध्ये त्यांच्या पत्नी मस्साजोगच्या सरपंच झाल्या होत्या. मात्र त्यानंतर ते स्वत: देखील सरपंच झाले. यावरुन त्यांची गावच्या राजकारणावर असलेली पकड समजते. त्यांच्या पश्चात आई,वडील,भाऊ,पत्नी,मुलगा व मुलगी नातेवाईक आहेत.
सतोष देशमुख हत्या प्रकरणात आत्तापर्यंत कोणा कोणाला अटक?
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींना गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. प्रतीक घुले याला रांजणगावमधून अटक करण्यात आली. एकूण आठ आरोपी पैकी तीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत. उर्वरित फरार आरोपीच्या शोधात दोन पथके रवाना झाली आहेत. जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे असे फरार झालेल्या आरोपींची नावे आहेत.
सरपंच खून प्रकरणात आणखी एकाला अटक; अफेवर विश्वास ठेवू नये – पोलीस अधीक्षक बारगळ
बीड जिल्ह्यातील सरपंचाच्या खून प्रकरणात पोलिसांनी आणखी एका आरोपीला पुण्याहून अटक केलीय. प्रतीक घुले असं ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचा नाव असून उर्वरित फरार आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची दोन पथके रवाना झाले आहेत. केज तालुक्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून खून करण्यात आला. या प्रकरणात केज पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल असून यातील एकूण तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली. आज सकाळी या प्रकरणातील आणखी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर नागरिकांनी कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी केले आहे.