राज्य शासनाच्या 10 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; गत सप्ताहात बदली झालेल्या हर्षदीप कांबळे यांच्या बदलीचा घोळ

0
1

मुंबई : मंत्रिमंडळ खातेवाटप झाल्यानंतर आणि गुरुवारी मंत्रिमंडळ बैठक आटोपताच प्रशासकीय बदलास सुरुवात झाली असून १० आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या राज्य शासनाकडून करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे गत सप्ताहात बेस्टच्या महाव्यवस्थापकपदी बदली झालेल्या हर्षदीप कांबळे यांच्या बदलीचा पुन्हा गुरुवारी आदेश काढण्यात आला आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या मुख्य सचिवपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

गणेश नाईक यांच्याकडे असलेल्या वनविभाग खात्याच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी मिलींद म्हैसकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर धनंजय मुंडे यांच्या अन्न आणि नागरी पुरवठा खात्याच्या सचिवपदी जयश्री भोज यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच पंकजा मुंडे यांच्याकडे असेलल्या पर्यावरण खात्याच्या मुख्य सचिवपदाची जबाबदारी विनिता वेद सिंघल यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

अधिक वाचा  राज्य मंत्रीमंडळ बैठकीत 14 निर्णय; मुंबई- ठाणे नविन मेट्रो मार्गिका, पुणे-लोणावळा हा निर्णय, सर्व जाणून घ्या! 

हर्षदीप कांबळे यांच्या बदलीचा घोळ

बेस्टच्या महाव्यवस्थापक पदी अनिल डिग्गीकर यांची बदली होऊन हर्षदीप कांबळे हे पद स्वीकारणार असे पत्रक काही दिवसांपूर्वी अप्पर मुख्य सचिव यांच्याकडून देण्यात आले होते. परंतु आज अप्पर मुख्य सचिव यांच्याकडून आणखी एक पत्र हर्षदीप कांबळे यांच्याबदली संदर्भात आले. या पत्रात हर्षदीप कांबळे यांना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय, मुंबई या रिक्त पदाचा भार त्वरित स्वीकारण्यास रुजू सांगितले आहे.

कोणत्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या?

१)जयश्री भोज, (सध्या कार्यरत- महाआयटी) अन्न आणि नागरी पुरवठा सचिव म्हणून नियुक्त

अधिक वाचा  राज्यात ओबीसी उपसमिती काय काम करणार?; उपसमितीची कार्यकक्षाही निश्चित झाली फडणवीसही सरसावले

२)जितेंद्र दुड्डी, (सध्या कार्यरत- जिल्हाधिकारी, सातारा) यांची पुणे येथे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती.

३)विनिता वेद सिंघल (सध्या कार्यरत- प्रधान सचिव, कामगार) प्रधान सचिव, पर्यावरण, म्हणून नियुक्त

४) आय ए कुंदन, (सध्या कार्यरत- एसीएस स्कूल एज्यु) प्रधान सचिव, कामगार म्हणून नियुक्ती.

५)मिलिंद म्हैसकर एसीएस पब हेल्थ एसीएस फॉरेस्ट म्हणून नियुक्त.

६) वेणुगोपाल रेड्डी, एसीएस फॉरेस्ट, एसीएस, हायर आणि टेक.एड्यु.

७) निपुण विनायक, रुसा सचिव, पब हेल्थ (१) म्हणून नियुक्ती.

८)संतोष पाटील, (सध्या कार्यरत- मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. पुणे) यांची जिल्हाधिकारी सातारा म्हणून नियुक्ती.

अधिक वाचा  सत्येच्या केंद्रस्थानी कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी शिवसेनेशी युती; मा. आनंदराज आंबेडकरांची भूमिका स्पष्ट झाली

९)हर्षदीप कांबळे, प्रधान सचिव, सामाजिक न्याय म्हणून नियुक्ती.

१०)विकासचंद्र रस्तोगी, प्रधान सचिव, उच्च व तंत्रशिक्षण. प्रधान सचिव, कृषी म्हणून नियुक्ती.