मंत्रिपद मिळूनही मुंडे बहीण-भाव ‘वजनदार’ खात्यापासून वंचित! महाजन, विखे पाटलांनाही फटका?

0

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर केले. या खातेवाटपामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात काम केलेल्या अनेक मंत्र्यांची खांदेपालट झाली. पहिल्यांदाच मंत्रिमंडळात संधी मिळालेल्या नेत्यांना मोठी जबाबदारी मिळाली. मात्र, मंत्रिमंडळात स्थान मिळूनही ‘वजनदार’ खात्यापासून अनुभवी मंत्र्यांना वंचित राहावे लागले आहे. त्यामध्ये पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या भावा बहिणीचा देखील समावेश आहे.

मंत्रिमंडळात स्थान मिळालेल्या पंकजा मुंडे या विधान परिषदेमधील एकमेव आमदार आहेत. 2014 च्या देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात पंकजा मुंडे यांच्याकडे महिला विकास आणि ग्रामविकास सारखे वजनदार खाते होते. मात्र, यंदा त्यांना पर्यावरण आणि पशुसंवर्धन हे खाते मिळाले आहे. त्यामुळे मंत्रिपद मिळूनही त्यांचे डिमोशन झाल्याची चर्चा आहे.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणानंतर धनंजय मुंडे यांना मंत्रिपद देऊ नये, अशी मागणी होत होती. मात्र, त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण हे खाते मिळाले आहे. एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात मुंडे यांच्याकडे कृषीमंत्रिपदासारखे वजनदार खाते होते. मात्र, पुन्हा ते त्यांच्याकडे न देता अन्न व नागरी पुरवठा खाते देण्यात आले.

महाजन, विखे पाटलांनाही फटका?

भाजपमधील गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील या मंत्र्यांचे देखील डिमोशन झाले आहे. एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळात गिरीश महाजन यांच्याकडे ग्रामविकास हे खाते होते मात्र देवेंद्र फडणविसांच्या मंत्रिमंडळात जलसंपदा खाते त्याकडून विभागून आले आहे. तसेच आपती व्यवस्थापन खाते देखील त्यांना मिळाले आहे.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळात महसूल मंत्री असलेले राधाकृष्ण विखे पाटील यांना फडणवीसांच्या मंत्रिमंडळात जलसंपदा खाते मिळाले आहे. या खात्यामध्ये त्याच्यांकडे गोदावरी आणि कृष्णा खोरे विकास महामंडळ असणार आहे.