मंदार बलकवडे संकल्पनेतील ‘नवकोरं’ चंद्रकांतदादाच प्रचारगीतचं बनलं स्वागतगीत; उत्साह अन् प्रेरणादायी बोल!

0
30

कोथरूड विधानसभा मतदारसंघ निवडणूक ऐन रंगात येत असताना भारतीय जनता पक्ष उपाध्यक्ष मंदार बलकवडे यांनी एक सूजनात्मक रचना करत विद्यमान आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या कार्य आणि स्वभाव अनुरूप अशा संगीतकार साई-पियुष यांचे संगीत व अदिती द्रविड लिखित एका ‘प्रचारगीता’ची निर्मिती केली आणि चंद्रकांतदादा पाटील यांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेशी रचना झाल्यामुळे आज महाराष्ट्रात कोणत्याही भागांमध्ये चंद्रकांत दादा पाटील यांचा दौरा ठरत असताना त्यांच्या स्वागताला याच गीताचे बोल कानी पडत आहेत!

कोथरूड विधानसभा मतदारसंघांमध्ये चंद्रकांतदादा पाटील विजयी झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये ‘एक आगळ वेगळं मॉडेल’ कोथरूडच्या रूपाने निर्माण करण्याचे काम केले आहे. कोथरूड विधानसभा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला असला तरी सुद्धा पर्व नवे निर्धार नवा या विचाराने चंद्रकांतदादा पाटील यांनी कोथरूड विधानसभा मतदारसंघातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिक या सर्वांसाठी एक अनोख ‘ड्रीम मॉडेल’ तयार केलं! प्रत्येकाची आस्थेवाईक चौकशी अन प्रत्येकाला स्व-खुशीने होणारी मदत यामुळे कोथरूड विधानसभा मतदारसंघ पुणे शहरात वेगळ्या कारणाने चर्चिला जात आहे. भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला कोथरूड समजला जात असला तरी सुद्धा कार्यकर्त्यांसाठी आस्थेवाईक चौकशी करणारे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते म्हणूनचं गीताचे बोल…. आमचा नेता चंद्रकांतदादांचं हवा ! चंद्रकांतदादांचं हवा ! प्रत्येक कार्यकर्त्याला साजेशे वाटतात.

अधिक वाचा  ‘समस्त कोथरूड’ने देखाव्यांची ‘संस्कृती’च बदलली; सर्वत्र जिवंत देखावे अन् पौराणिक मंदिरे

पुणे शहरात सध्या पालकमंत्री पद चर्चेचे बनले असताना पुन्हा एकदा याच गीताची चर्चा सुरू झाली असून नुकतेच कॅबिनेट मंत्री म्हणून पदभार स्वीकारलेल्या चंद्रकांत दादा पाटील यांच्या आगमनासाठी चौकाचौकात आजही हेच गीत वाजवले जात आहे.

मंदार बलकवडे यांच्या संकल्पनेतील गीत-

(संगीतकार साई-पियुष यांनी संगीतबध्द व अदिती द्रविड यांनी लिखित)

पर्व नवे, निर्धार नवा…

मनात एकच ध्यास आत्ता।

बळात क्रांती, जनांत शांती.

चंद्रकांत अध्याय नवा!

एकच तोरा… एकच नारा…

आमचा नेता चंद्रकांतदादांचं हवा ! चंद्रकांतदादांचं हवा !

जनतेचा आधार तो, पाठिशी खंबीर तो

बुद्‌धी, शक्ती, कष्ट-भक्ती, आमचा आदर्श तो।

अधिक वाचा  राज्य मंत्रीमंडळ बैठकीत 14 निर्णय; मुंबई- ठाणे नविन मेट्रो मार्गिका, पुणे-लोणावळा हा निर्णय, सर्व जाणून घ्या! 

ठाई ठाई जनमनात… राही राही हरमुखात…

आमचा नेता चंद्रकांतदादांचं हवा ! चंद्रकांतदादांचं हवा!