मिलेनियम शाळा व्यवस्थापनावर कडक कारवाई करा; भारतीय जनता युवा मोर्चा कोथरूडचे पोलिसांना निवेदन

0
1

मिलेनियम शाळेतील मानवतेला काळीमा फासेल असा बाल शोषणाचा गैरप्रकार आपण बघत आहोत याप्रकारच्या घटना वरचेवर घडत आहेत आणि आपल्याला समाज कोणत्या वाटेवर चालला आहे हा प्रश्न नक्कीच पडतो. शैक्षणिक व्यवस्थापन आणि सुरक्षा याकडे वारंवार कोथरूड भागातील शैक्षणिक संस्था दुर्लक्ष करत असून या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी ठोस पर्याय निर्माण करण्याची गरज आहे. परिसरातील सर्व शैक्षणिक संस्थांची पोलीसांवमार्फत मासिक तपासणी व सर्व शैक्षणिक संस्था काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पोलीस पडताळणी आवश्यक करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

भारतीय जनता युवा मोर्चा कोथरूड मतदारसंघ अध्यक्ष अमित तोरडमल यांनी कोथरूड हा पुणे शहराचा एक आदर्शवत भाग आहे त्या अनुसरून आमची पोलिस प्रशासनाला विनंती आहे की, कोथरूड परिसरातील सर्व शैक्षणिक संस्थांना आरोग्य आणि कर्मचाऱ्यांचे चारित्र्य पडताळणी या गोष्टींबाबत प्रबोधन करण्यासाठी ठोस पावले उचलावी. शैक्षणिक संस्थेमध्ये एखादा कर्मचारी नियुक्त करताना त्याची पूर्वकल्पना पोलीस प्रशासनाला व शिक्षण विभागाला ठराविक कालावधीत देणे बंधनकारक कोणत्याही कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी झाल्याशिवाय त्याला कामावर हजर राहण्यास परवानगी पोलीस पडताळणी मध्ये चारित्र्य पडताळणी न केलेले किंवा नव्याने पूर्वकल्पना न दिलेले कर्मचारी आढळल्यास तात्काळ संस्था चालकांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी केली आहे.

अधिक वाचा  पुणे मानाचे गणपती विसर्जन मिरवणुक वेळापत्रक समोर, असा असेल मार्ग? पोलिस आयुक्त अमितेश कुमारांची माहिती

या प्रकरणातील दोषीला अटक झाली आहे, तरी सदर प्रकरणात शाळा प्रशासन, मुख्याध्यापक व संबंधित शिक्षकही तितकेच जवाबदार आहेत. सदर गुन्ह्यात यांनाही दोषी मानून सखोल चौकशी करून कठोर कारवाई व्हावी व पिडीत बालक व परिवारास न्याय मिळावा. यापुढील काळात अशा प्रकारच्या प्रवृत्तींवर आळा घालण्यासाठी प्रशासनाने कठोर उपाययोजना राबवाव्यात. असे न झाल्यास भारतीय जनता युवा मोर्चा संघर्षासाठी रस्त्यावर उतरण्यास तत्पर आहे. प्रसंगी संस्थाचालकांची गाढवावरूनही दिंड काढली जाईल असे निवेदनात म्हटले आहे.