प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक प्रवीणजी बडेकर यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

0

पुणे : पुण्यातील प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक बढेकर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण बढेकर यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

कोथरूड येथील महापालिकेच्या अण्णाभाऊ पाटील शाळेत या उपक्रमाचे आयोजन विघ्नहर्ता मोबाईल, सागर शिंदे, गौरव शिंदे, अमित शिंदे यांनी केले होते. यावेळी ५३५ विद्यार्थ्याना नोट पॅड, दप्तर (सॅक), कंपास असे शालेय साहित्य प्रविण बढेकर यांच्या हस्ते देण्यात आले.

यावेळी चिन्मय चव्हाण, सर्वेश केनी, अनिकेत डोक, जीवन दुधाने यांचे सहकार्य लाभले. शालेय साहित्य मिळाल्यानंतर मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता. या प्रसंगी मुलांनीही बढेकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सामजिक जान असणारे बांधकाम व्यावसायिक म्हणून प्रविण बढेकर यांच्याकडे पाहिले जाते आणि म्हणूनच त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या सामजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार