ब्रिसबेन टेस्ट आधी भारतासाठी टेन्शन वाढवणारी बातमी, स्टार खेळाडू बाहेर होणार का?

0

भारतासाठी ऑस्ट्रेलिया दौरा आतापर्यंत बरा म्हणावा असा आहे. उत्तम म्हणता येणार नाही. कारण पहिल्या कसोटीत विजय, दुसऱ्या कसोटी सामन्यात पराभव झाला. टीम इंडियाने शानदार सुरुवात केली होती. पर्थमध्ये यजमान ऑस्ट्रेलियावर एकतर्फी विजय मिळवला. त्यानंतर दुसऱ्या अॅडलेड कसोटीत ऑस्ट्रेलियाने पराभवाची सव्याज परतफेड केली. ऑस्ट्रेलियाने या डे-नाइट टेस्ट मॅचमध्ये भारताला 10 विकेटने हरवलं. आता मालिका 1-1अशी बरोबरीत आहे. टीम इंडियाला मालिकेत पुनरागमन करावं लागणार आहे. पण त्याआधी टीम इंडियाचा स्टार बॉलर जसप्रीत बुमराहच्या फिटनेसबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येतय. अॅडलेड कसोटीत त्याच्या फिटनेसमध्ये समस्या जाणवली होती. जसप्रीत बुमराह तिसरा कसोटी सामना खेळणार का? हा प्रश्न विचारला जातोय.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

अॅडलेड ओव्हलवरील तिसरा कसोटी सामना फक्त तीन दिवस आणि एका सेशनमध्ये संपला. तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सेशनमध्ये टीम इंडियाने हा कसोटी सामना गमावला. टीम इंडिया हरली. पण जसप्रीत बुमराहने चमकादर कामगिरी केली. ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्या डावात जसप्रीत बुमराहने चार विकेट काढले. ऑस्ट्रेलियाला 337 धावांवर रोखलं. पण टीम इंडियाला दुसऱ्या डावात दमदार फलंदाजी करता आली नाही. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियन टीमला फक्त 19 धावांच लक्ष्य मिळालं.

पहिली ओव्हर टाकली

तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियन टीम फक्त 19 धावांच लक्ष्य पार करण्यासाठी उतरली होती. दुसऱ्या इनिंगमध्ये बुमराहने पहिली ओव्हर टाकली. यावेळी बुमराहने जे 6 चेंडू टाकले, त्याने त्याच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह निर्माण केलय. या ओव्हरमध्ये बुमराहने टाकलेल्या प्रत्येक चेंडूचा वेग 120 किलोमीटर ते 130 किलोमीटर प्रतितास होता. फक्त शेवटच्या चेंडूचा वेग 131 kmph होता. आता प्रश्न उपस्थित होतोय की, बुमराह पूर्णपणे फिट नव्हता का?. कारण सामान्यत: बुमराहच्या चेंडूचा वेग 140 kmph च्या आसपास असतो.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

फिटनेसबद्दल मनात शंका के येतेय?

बुमराहच्या फिटनेसबद्दल शंका यासाठी उपस्थित केली जातेय, कारण सामान्यात एकवेळ बुमराहला वेदना जाणवत होत्या. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या इनिंगमध्ये 81 व्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करताना बुमराह चौथा चेंडू टाकण्याआधी मैदानात बसला होता. त्याने ग्रोइनमध्ये त्रास होत असल्याच सांगितलं होतं. ते दृश्य पाहून भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या काळाजाचा ठोका चुकला. भारतीय फिजियोने येऊन त्याची तपासणी केली. दिलासा देणारी बाब म्हणजे बुमराह त्यावेळी लगेच उठला आणि संपूर्ण सामन्यात गोलंदाजी केली.