आमदार सुनील टिंगरेंकडून शरद पवारांना नोटीस, सुप्रीय सुळे यांचा गौप्यस्फोट

0
1

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे चर्चेत आले आहे. आमदार सुनील टिंगरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नोटीस पाठवली आहे, असा गौप्यस्फोट खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. पुणे येथील पोर्श कार अपघात प्रकरणात ही नोटीस पाठवल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. सुप्रिया सुळे यांनी पुणे येथील वडगाव शेरीत आयोजित सभेत हा गौप्यस्फोट केला आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, सुनील टिंगरे यांनी पाठवलेली नोटीस मी स्वतः नोटीस पाहिली नाही. मंचावर एका व्यक्तीने ती बघितली आहे. सुनील टिंगरे यांनी धमकी दिली आहे की जर तुम्ही पोर्श केसमध्ये माझी बदनामी केली तर तुम्हाला कोर्टात खेचू. आता ही नोटीस मी बघणार आहे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

अधिक वाचा  मराठा समाजानंतर OBC समाजासाठीही उपसमितीची स्थापना; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

सत्यमेव जयते होणार…
पोर्श चालकाकडून हत्या झाली असेल आणि त्याला कोणी वाचवण्याचा प्रयत्न केला असेल तर आम्ही बोलणार असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या. त्या घटनेच्या वेळी स्थानिक आमदार पोलीस ठाण्यात गेले होते. ते का गेले होते? या प्रकरणावर पवार साहेब जर खरे बोलले तर त्यांना वकिलातून नोटीस पाठवली जाते. परंतु आम्ही तयार आहोत. कारण नेहमी सत्यमेव जयते होते.

बापू पठारे कॅबिनेट मंत्री होणार
लोकशाहीमध्ये विरोधक पाहिजे असतात. माझ्या विरोधात तर सगळी यंत्रणा होती. सरपंच ते केंद्र सरकार यंत्रणा होती. त्यानंतरही जनतेने मला निवडून दिले, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले. महाविकास आघाडीचे सरकार आल्यास ज्येष्ठ मार्गदर्शक म्हणून बापू पठारे कॅबिनेट मंत्री असतील? अशी घोषणा वडगाव शेरीच्या सभेत सुप्रिया सुळे यांनी केली. बापू तुमच्याकडून फार अपेक्षा आहेत, मला एक शब्द द्या, तुमच्या मतदारसंघात अपघात झाल्यास पोलीस स्टेशनला न जाता रुग्णालयात जाल. रुग्णालयात जाऊन त्या गरीब माणसाला मदत कराल, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

अधिक वाचा  ओबीसींसाठी उपसमिती गठीत, चंद्रशेखर बावनकुळे अध्यक्ष छगन भुजबळ, पंकजा मुंडेंसह बडे मंत्री सदस्य