दिवाळीच्या पहिल्या दिवशी मुंबई लोकलची सेवा कोलमडली, पश्चिम रेल्वेवर मोठा खोळंबा

0
1

मुंबईची लाईफलाईन अशी ओळख असणाऱ्या मुंबई लोकलची सेवा कोलमडली आहे. दिवाळी सणाच्या पहिल्या दिवशी पश्चिम रेल्वेचा मोठा खोळंबा झाला आहे. पश्चिम रेल्वेवरील केळवे रोड स्थानकात इंजिन फेल झाल्याने अनेक लोकल, एक्सप्रेस गाड्या यांची वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होताना दिसत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. यामुळे मुंबईकडे येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या उशिराने धावत आहेत. पश्चिम रेल्वेवरील केळवे रोड स्थानकादरम्यान इंजिन फेल झाले आहे. त्यामुळे गुजरातहून मुंबईकडे येणाऱ्या अनेक गाड्यांचा खोळंबा झाला आहे. या तांत्रिक बिघाडामुळे वंदे भारत एक्सप्रेसही पालघर स्थानकावर रखडली आहेत. केळवे रोड स्थानकात झालेल्या बिघाडामुळे पालघर ते विरार, आणि पालघर ते चर्चेगेट या दिशेने धावणाऱ्या लोकल धीम्या गतीने धावत आहेत.

अधिक वाचा  राज्य मंत्रीमंडळ बैठकीत 14 निर्णय; मुंबई- ठाणे नविन मेट्रो मार्गिका, पुणे-लोणावळा हा निर्णय, सर्व जाणून घ्या!