अजित पवारांच्या बंडानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. तसेच राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा देखील जोरात होत आहे. यादरम्यान राज्यातील विधानसभेचं पावसाळी अधिवेशन मात्र लांबणीवर पडण्याची शक्यता समोर आली आहे. पावसाळी अधिवेशन नियोजित १७ जुलै ऐवजी पुढे जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आज होत असलेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत याचा निर्णय घेतला जाणार आहे.






आज दुपारी कामकाज सल्लागार समितीची बैठक होणार असून या बैठकीत १७ जुलै रोजी नियोजित पावसाळी अधिवेशन पुढे ढकल्यात येणार आहे. चर्चेनंतर पावसाठी अधिवेशनाची पुढील तारीख ठरवली जाणार आहे. एकनाथ शिंदे सरकारच्या उर्वरित मंत्रिमंडळाचा विस्तार त्यानंतर विधीमंडळाचे सुरू असलेली कामे यामुळे हे अधिवेशन पुढे ढकलण्यात येत आहे. आजच्या बैठकीत सर्वपक्षिय नेते याबद्दल चर्चा करतील त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल.
मंत्रिमंडळ विस्तार कधी?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, राज्यातील युती सरकारच्या पुढील मंत्रिमंडळा विस्ताराची तारीख ही ठरल्याचे सुत्रांनी म्हटले आहे. येत्या ९ जुलै किंवा १० जुलै रोजी उर्वरित मंत्रीमंडळाचा विस्तार करण्याचा युती सरकारचा मानस असल्याची माहिती समोर आली आहे.
पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर विस्तार होत असताना. शपथ घेणाऱ्या मंत्र्यांसाठी मिळालेल्या संबधित खात्यांची माहिती असावी याअनुशंगाने आता हालचालींना वेग आलेला आहे.
मंत्री मंडळाच्या विस्ताराबाबत कालच रात्री मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची नंदनवन या शासकिय निवास स्थानी बैठक झाली. उर्वरित मंत्रीमंडळाच्या विस्तारात भाजप व शिवसेनेच्याच आमदारांचा शपथविधी होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.











