विरोधी पक्षांना धक्का; समान नागरी कायद्याला कुस्तीपटूचा पाठिंबा

0

भारतीय राजकारणात सध्या Uniform Civil Code अर्थात समान नागरी कायद्याची जोरदार चर्चा सुरू आहे. सत्ताधारी भाजप हे बील आणण्याच्या तयारीत आहेत. तर याला काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांचा याला विरोध आहे. मात्र आता समान नागरी कायद्याच्या समर्थनात कुस्तीपटू मैदानात उतरला आहे. ऑलिम्पिक पदक विजेत्या कुस्तीपटूने याबाबत ट्विट केले.

भारताचा हा ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू योगेश्वर दत्त आहे. तो भाजपशी जोडला गेला आहे. त्याने ट्विट केले की मी समान नागरी कायद्याला समर्थन देत आहे. एक संविधान, एक भूमी, एक राष्ट्र आणि एक भारत तुम्ही देखील याला पाठिंबा द्या.’

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

मिळालेल्या माहितीनुसार केंद्र सरकार जुलै महिन्यात होणाऱ्या पावसाळी अधिवेशन सत्रात समान नागरी कायदा विधेयक आणण्याच्या तयारीत आहे. योगेश्वर दत्तने 2012 च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक पटकावले होते. तर त्याने कॉमनवेल्थ गेम्समध्ये दोन सुवर्ण पदक, एशियन गेम्समध्ये एक सुवर्ण पदकासह दोन पदके पटकावली आहेत.

जर देशात समान नागरी कायदा लागू झाला तर प्रत्येक व्यक्तीला मग तो कोणत्याही धर्माचा किंवा जातीचा असेल त्यासाठी एकच कायदा असेल. एवढेच नाही तर समान नागरी कायद्यात लग्न, तलाक किंवा जमीन – संपत्तीच्या वाट्याबातही सर्व धर्मांसाठी एकच कायदा लागू होईल. समान नागरी कायद्याचा मसुदा तयार झाल्यानंतर त्याच्यावर जवळपास 19 लाख लोकांनी आपली मते नोंदवली आहेत.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

दुसरीकडे काँग्रेसने लोकसभा निवडणुकीच्या आधी असे बील आणण्यास विरोध केला आहे. मात्र केरळचे राज्यपाल आरिफ खान यांनी समान नागरी कायद्याचे खुले समर्थन केले आहे. ते म्हणाले की समान नागरी कायद्याच्या विरोधात जे तर्क दिले जात आहे ते ठीक नाहीयेत. हा भारताच्या विविधतेवर आघात आहे, अल्पसंख्यांकांच्या परंपरेवर हल्ला आहे असे बोलणे ठिक नाही. हा समान नागरी कायदा हा न्याच्या अधिकारावर फोकस करतो.