बालासोर दुर्घटनेनंतर 51 तासाच पु्न्हा रेल्वे सुरू; रेल्वेमंत्री घटनास्थळीच बसुनच मालगाडीही रवाना

0

ओडिशा : ओडिशातील बालासोर येथे शनिवारी संध्याकाळी झालेल्या रेल्वे अपघातानंतर अनेकांना त्याचा धक्का बसलेला आहे. त्या अपघातात आतापर्यंत 275 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातानंतर आता या प्रकरणाचा तपास सीबीआयकडून करण्यात येणार आहे. आता या अपघातानंतर आता महत्वाची गोष्ट म्हणजे बालासोरमध्ये दोन्ही डाऊन लाईन सुरू झाल्या आहेत. या अपघातानंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव घटनास्थळी उपस्थित असून त्यांच्या उपस्थितीत आज एक मालगाडी डाऊन लाईनवरून सोडण्यात आली आहे. याच ठिकाणाहून मालगाडी गेल्यानंतर रेल्वेमंत्र्यांनी हात जोडून आभार मानले आहेत.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

अपघात ठिकाणाहून मालगाडी निघून गेल्यानंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी प्रसारमाध्यमांबरोबर बोलताना सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी येथे आले होते. त्यानंतर त्यांनी सांगितले की, सर्वांनी पूर्ण तत्परतेने काम करण्याच्या सूचना त्यांना दिल्या आहेत. त्यामुळे आता रेल्वे कर्मचाऱ्यानीही आता जोरदार पणे काम सुरु केले आहे. अपघातानंतर आता या दोन्ही ट्रॅकची दुरुस्ती करण्यात आली असून अपघातानंतर 51 तासामध्ये रेल्वेची वाहतूक सुरू करण्यात आली आहे. अपघातानंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव 51 तासांहून अधिक काळ घटनास्थळी तळ ठोकून आहेत. त्यांच्या देखरेखीखाली बचाव आणि मदतकार्यही सुरू करण्यात आले आहे.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

या अपघाताची सीबीआयमार्फत चौकशी करण्याच्या सूचना करण्यात आल्याची माहितीही रेल्वेमंत्री वैष्णव यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. यावेळी त्यांना सांगितले की, रेल्वे अपघाताला जबाबदार असलेल्यांची आता खात्री पटली आहे. त्यामुळे या प्रकरणातील कोणत्याही दोषीला सोडणार नसून त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे.

बालासोरजवळ कोरोमंडल एक्स्प्रेसची अप लूप लाइनमध्ये उभ्या असलेल्या मालगाडीला येऊन धडक बसली आहे. त्यानंतर रुळावरून घसरलेल्या बोगी एकाच वेळी डाऊन मार्गावरून जाणार्‍या बेंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेसच्या दोन मागील बोगींवर आदळल्या आहेत. त्यामुळेच या अपघातात आतापर्यंत 275 जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक हजाराहून अधिक लोकं जखमी झाली आहेत. त्यामुळे या प्रकरणात दोषी असणाऱ्यांवर कडकर कारवाई केली जाणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले आहे.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता