पुणे : शिवसेना ठाकरे पक्षाची कोथरूड मधून चंद्रकांत मोकाटे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असून कोथरूड मध्ये चंद्रकांत पाटील विरुध्द चंद्रकांत मोकाटे अशी लढत पाहायला मिळणार आहे.






गेल्या चार पाच दिवसांपासून शिवसेना ठाकरे पक्षाकडून कोथरूड मतदारसंघात चंद्रकांत मोकाटे की पृथ्वीराज सुतार यांना उमेदवारी जाहीर केली जाणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. अखेरीस चंद्रकांत मोकाटे यांच्यावर ठाकरेंनी विश्वास दाखवत त्यांची उमेदवारी जाहीर केली.











