‘कोथरुड’ मशालीचे रंजक वळण यासाठीच अट्टाहास? यांच्या ‘स्टेटस’मुळे पडद्यामागची घडामोड उघड…

0
3

कोथरूड विधानसभा अन् टिविस्ट जणू एका नाण्याच्या दोन बाजूच आहेत की काय अशी शंका निर्माण सर्वसामान्यांचीही झाली आहे… कारण कोथरूड विधानसभेची निर्मिती झाल्यापासून कायम काहीतरी धक्कादायक घडामोड प्रत्येक विधानसभेच्या वेळेस घडत असते! यंदा विधानसभा निवडणुकीतही कधी नव्हे तेवढे भारतीय जनता पक्षात बंडाचे वारे फुटले तरी पुन्हा एकदा त्याच उमेदवाराला संधी पक्षाची हॅट्रिक साध्य करण्यास दिली असल्याने विरोधी गटात प्रचंड घडामोडी घडत असून भाजपा बंडाचे फायदे उठवण्यासाठी शिवसेनेचा हक्काचा मतदारसंघ म्हणून कायमच ओळखला जाणारा ‘कोथरूड’ कोथरूडची उमेदवारी अजूनही रखडलेली आहे. गेल्या दोन आठवड्यापासून मातोश्री आणि पुण्यात कायम बैठका रंगत आहेत परंतु निर्णय मात्र कोणताच होत नाही नवा प्रयोग करायचा की सैनिकाला संधी द्यायची हेच ठरत नसल्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख संपत आली तरीही ठोस निर्णय झालेला नाही. आज कोथरूड शिवसेनेसाठी महत्त्वाचा दिवस आहे आज संध्याकाळीच निर्णय होण्याची आशा शिवसैनिकांना वाटत आहे.

अधिक वाचा  राज्यात 8 जिल्ह्यांना पुन्हा ‘ऑरेंज’अलर्ट गणेश विसर्जन पावसात?; कोकण, मध्य महाराष्ट्र अतिवृष्टीचा इशारा

2009 साली प्रबळ दावेदार दीपक मानकर यांना जामीन मिळाल्यानंतर अपक्ष निवडणूक लढवावी लागली पण धक्कादायक पणे मनसेचे उमेदवार दुसरे स्थानी राहिले. 2014 साली स्वतंत्र निवडणूका झाल्यानंतर एका महिला उमेदवाराने ‘बालेकिल्ला’ धक्कादायक मताधिक्याने भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात दिला. 2019 मध्ये त्याच महिला उमेदवाराचे तिकीट कापलं थेट लढतीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीने वेगळ्या विचाराच्या (मनसे) उमेदवाराला पाठिंबा दिला. 2024 विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने प्रचार सुरू झाला असला तरी 2019 प्रमाणे तोडीस तोड उमेदवार असा आग्रह मित्रपक्षाने केल्यामुळे शिवसेनेची उमेदवारी रखडली आहे. शिवसेनेकडे मूळचे दोन पर्याय (प्रथम आमदार आणि माजी कृषी मंत्री यांचा मुलगा) उपलब्ध होते परंतु त्यांच्यामध्ये शेवटपर्यंत सामंजस्य करण्यास यश आलेले दिसत नाही. त्यातच भाजप बंडखोर प्रबळ दावेदार यांनाही अखेरच्या क्षणी ‘मातोश्री’त प्रवेशाचे तिकीट मिळाले असल्याने नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.

अधिक वाचा  बुद्धीदेवता गणरायाला शालेय साहित्य आरस; मोरया मित्र मंडळाचा उपक्रम आदर्शवत : पोलीस निरीक्षक काइंगडे

कोथरूड विधानसभेतील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांच्या विरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कोणाला संधी देते यामध्ये सध्या स्पर्धा सुरू झालेली असताना समर्थक कार्यकर्त्यांचे स्टेटस गेले दोन आठवडे रंजक होत असून आज रविवारचा दिवस शिवसैनिकांसाठी महत्त्वाचा झाला आहे. यामागची घडामोड ‘न्यूजमेकर.live’च्या हाती लागली असून त्यामधून उद्या कोथरूड शिवसेनेमध्ये काय घडणार याचा अंदाज बांधणे शक्य झाले आहे. खरंतर कोथरूड शिवसेना वेगळा निर्णय घेणार याचे संकेत दोन-तीन दिवसापासून मिळत होते. सर्वात अगोदर मातोश्रीवर स्थानिक पदाधिकाऱ्यांना बोलवण्यात आले मताधिक्यावरून पदाधिकाऱ्यांची ‘कानउघडणी’ही झाली. त्यानंतर दोन मूळ पक्षातील निष्ठावान पदाधिकाऱ्यांना बोलून सामंजस्याने तोडगा काढण्याचा प्रयत्न झाला परंतु आता कोथरूड विधानसभा मतदारसंघांमध्ये नवी चर्चा सुरू झाली आहे ती म्हणजे आयात उमेदवार दिला जाणार की शिवसैनिक!

अधिक वाचा  संविधानाच्या माध्यमातून पंचशीलेला कायद्याचे अधिष्ठान प्राप्त झाले आहे – विनोद मोरे

काल शनिवारच्या दिवसभर कोथरूडमध्ये फक्त समर्थकांच्या ‘स्टेटस’ची चर्चा होती. (तसे हे ‘स्टेटस’चे हे युद्ध निवडणूक घोषणा झाल्यापासून सुरू आहेत) परंतु आज अचानक दोन युवा सेना पदाधिकाऱ्यांच्या आलेल्या ‘स्टेटस’मुळे कोथरूडची उमेदवारी रंजक वळणावर गेली असल्याची जाणीव झाली आहे. एका ‘विशाल’नावाच्या युवा सैनिकाने आमचे दाजी यांना……. असा उल्लेख करत आयात उमेदवार दिला जाणार याची जाणीव करून दिली. त्यानंतर काही तासात कोथरूड विधानसभा मतदारसंघात सक्रिय असलेल्या ‘युवासेना’ पदाधिकाऱ्यानेही आयात उमेदवार नको शिवसैनिक अन पदाधिकारी काम करणार नाहीत अशी भूमिका जाहीर केल्याने कोथरूडचे राजकारण वेगळे वळणावर गेले आहे याची जाणीव होत आहे.