अक्षय कुमार बरोबर माझी तुलना करणे…कार्तिक आर्यनने स्पष्टच सांगितलं

0
12

भिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aryan) सध्या बॅक टू बॅक चित्रपट करत आहे. अलिकडच्या काळात तो सर्वाधिक चित्रपट करणारा अभिनेता म्हणून उदयास आला आहे. अभिनेता त्याच्या आगामी ‘भूल भुलैया ३’ (Bhool Bhulaiya 3) या चित्रपटामुळे चर्चेत आहे.

हा सिनेमा १ नोव्हेंबरला दिवाळीच्या मुहुर्तावर रिलीज होणार आहे.

२००७ साली आलेल्या ‘भूल भुलैय्या’चा हा तिसरा भाग आहे. पहिल्या भागात अक्षय कुमारने सर्वांचं मन जिंकलं होतं. तर दुसऱ्या भागात कार्तिक आर्यननेही कमाल केली होती. यातच कार्तिकची अक्षय कुमारसोबत केली जातेय. यावर आर्यनने स्वतःचे मौन तोडले आहे. कार्तिक म्हणाला, “मी स्वतःला त्याच्या पातळीवर कधीच पाहू शकत नाही. जेव्हा माझी त्याच्याशी तुलना केली जाते तेव्हा ते थोडे विचित्र वाटते. मी लहानपणापासून त्याचे चित्रपट पाहतो. आणि मी त्याचा खूप मोठा चाहता आहे”.

अधिक वाचा  भाजपकडून राजकीय सोयीसाठी प्रभागरचनेत नियमांचे उल्लंघन; काँग्रेस-राष्ट्रवादीचा संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप

‘भूल भुलैया ३’मध्ये विद्या बालनने कमबॅक केलं आहे. तर माधुरी पहिल्यांदाच हॉरर भूमिकेत पाहायला मिळणार आहे. कार्तिक आर्यनसह राजपाल यादव, विजय राज, संजय मिश्रा, अश्विनी काळसेकर, राजेश शर्मा यांचे कॉमेडी सीन्स प्रेक्षकांना खळखळून हसवणार आहेत. ‘भूल भूलैय्या 3’ तुफान मनोरंजन करणारा सिनेमा असणार हे नक्की. ‘भूल भूलैय्या ३’ हा सिनेमा रोहित शेट्टीच्या ‘सिंघम अगेन’शी भिडणार आहे.