निवडणूक आचारसंहिता नियम, १९६१ ४९ ब अंतर्गत आयोगाच्या सुधारणा सारख्या नावाचे दिवस गेले…; यापुढे EVM वर….

0

निवडणूक आली की समोरच्या उमेदवाराची मते फोडण्यासाठी त्याच्या सारख्याच नावाचे उमेदवार दिले जात होते. बऱ्याचदा या उमेदवारांची मते त्या सेम नावाच्या उमेदवाराला पडत होती. यामुळे या मतफरकाने तो उमेदवार पडत होता. परंतू, आता निवडणूक आयोगाने यावर उपाय काढला आहे. बऱ्याच मागण्यांनंतर निवडणूक आयोगाने ईव्हीएमवरील उमेदवार यादीवर नावाच्या पुढे उमेदवाराचा रंगीत फोटो देण्याचा निर्णय घेतला आहे.

ईव्हीएम मतपत्रिका अधिक स्पष्ट आणि वाचनीय बनवण्यासाठी त्याची रचना आणि छपाई शैली बदलण्यात आली आहे. येत्या बिहार निवडणुकीपासून याची सुरुवात केली जाणार आहे. निवडणूक आचारसंहिता नियम, १९६१ च्या नियम ४९ ब अंतर्गत आयोगाने सूचनांमध्ये सुधारणा केल्या आहेत. यानुसार ईव्हीएममध्ये आता उमेदवाराचे नाव आणि निवडणूक चिन्ह आणि त्याचा रंगीत फोटो असणार आहे.

अधिक वाचा  भाजपची यादी पुण्यात दाखल अजूनही प्रवेश सुरूच?; प्रशांत जगतापांचा ‘करेक्ट’ कार्यक्रम? काँग्रेसचे माजी राज्यमंत्री भाजपवासी?

गेल्या सहा महिन्यांत निवडणूक आयोगाने २८ वेगवेगळे बदल केले आहेत. उमेदवाराचा फोटो स्पष्टपणे दिसावा यासाठी, छायाचित्राचा तीन चतुर्थांश भाग हा नीट दिसण्यासारखा असणार आहे. हे फोटो नीट छापून येण्यासाठी आयोग कागदही चांगल्या प्रतीचा वापरणार आहे. त्यावरील अक्षरांचा आकारही मोठा आणि ठळक असणार आहे. मतपत्रिकेवरील फॉन्ट हा ३० असणार आहे. तसेच नावांसह नोटा देखील एकाच फॉन्टमध्ये असणार आहे. ही मतपत्रिका 70 GSM कागदावर छापलेली असणार आहे. तर विधानसभा निवडणुकीसाठी RGB गुलाबी रंगाच्या कागदाचा वापर केला जाणार आहे.

रंगीत छायाचित्रे, मोठे फॉन्ट आणि चांगल्या दर्जाचे कागद यामुळे त्यांना हव्या असलेल्या उमेदवाराला मतदान करण्यासाठी ग्रामीण भागातील लोकांचा, वृद्धांचा गोंधळ उडणार नाही. यामुळे मतदानावरील मतदारांचा विश्वास वाढणार आहे.

अधिक वाचा  पवारांना सोडताच प्रशांत जगतापांचा पक्ष अन् 2029 चे मोठे लक्ष्य ठरल; मुंबईत यांच्या उपस्थितीत होणार प्रवेश?