अजितदादांनी पुणे बालेकिल्ल्याच ठरवलं? ‘मिशन पालिका 2026’ मेगाप्लॅन काय?;  या तीन मतदारसंघातून आखणी सुरू

0

पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांची जिव्हाळ्याची संस्था म्हणून पुणेकरांना ज्ञात आहे. महाराष्ट्रात 2014 साली जे सत्तांतर झाले त्यामध्ये या महत्त्वाचे संस्था अजित दादांना गमवाव्या लागल्या. त्यानंतर 2019 नंतर झालेल्या सत्ता संघर्षामध्ये ज्या काही संस्थांना भारतीय जनता पक्षाच्या सत्तेचा फटका बसला त्यामध्ये या दोन महापालिकांचा प्रामुख्याने उल्लेख कराव्या लागेल. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात आणण्यासाठी अजितदादा पवार यांनी कंबर कसली असून महायुतीच्या चर्चा मध्ये न अडकता सर्वसामान्य कार्यकर्त्यांना ताकद देत स्थानिक पातळीवर नियोजन ही रणनीती आखण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बलस्थान असलेल्या हडपसर विधानसभा मतदारसंघापासून या ‘अभिनव’ उपक्रमाचा शुभारंभ झाला असून सलग 2 दिवसाच्या या उपक्रमामध्ये पहिल्या दिवशी नागरिकांच्या समस्या अन् दुसऱ्या दिवशी महत्त्वाच्या व्यक्तिमत्त्वांच्या गाठीभेटीद्वारे अजितदादा पवार पुन्हा या दोन्ही महापालिकांवर आपली विजय पताका फडकवण्याचे नियोजन करत आहेत. हडपसर विधानसभा मतदारसंघातील हा ग्रुप पूर्व यशानंतर हक्काचा असलेल्या खडकवासला विधानसभा मतदारसंघात 24 व 25 सप्टेंबर रोजी नवले लॉन्स सिंहगड रोड येथे जनसंवाद मेळावा असा कार्यक्रम आखण्यात आला आहे.

देवेंद्र फडणवीस 2014 साली पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विजय मिळू लागला काही ठिकाणी शिवसेना भाजप पारंपरिक युती सत्ताधारी बाकांवर बसली तर काही ठिकाणी स्वतंत्र भारतीय जनता पक्षाला स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात ठेवणे शक्य झाले. 2017 साली पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मध्ये अजित पवार विरोधीपक्षांमध्ये असताना पुणे व पिंपरी चिंचवड या दोन्ही महानगरपालिकेतही सत्ता मिळवण्यामध्ये भारतीय जनता पक्षाने यश मिळवले. अजित पवार यांचेच जिवलग भिडू भारतीय जनता पक्षाने गळाला लावत सत्तेचे स्वप्न साकार केले असले तरीसुद्धा पक्ष कार्यकर्ते आणि पक्ष बांधणीवर ते अजित पवार यांचा असलेला प्रचंड विश्वास यातूनच पुन्हा अजित पवार यांनी विजयश्री खेचून आणण्याचे नियोजन केले आहे. महाराष्ट्रात 2020 पासून रखडलेल्या या निवडणुकांमध्ये स्थानिक पातळीवर कुणाची ताकद जास्त आहे ते स्पष्टपणे समजणार आहे. त्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची होणार हे स्पष्ट आहे. पण या निवडणुकांमध्ये महायुतीचं देखील बिनसण्याची शक्यता आहे. कारण महायुतीचे घटक पक्ष काही ठिकाणी स्वबळावर लढण्याची तयारी करत आहेत. पुणे महापालिका निवडणुकीत भाजप स्वबळावर लढण्यावर ठाम आहे. त्यामुळे ही निवडणूक जास्त चुरशीची होण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

महाराष्ट्र राज्यामध्ये 1999 साली काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी एकत्र येत सत्ता मिळवली परंतु पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मात्र पुणे शहरांमध्ये सत्तेत येण्यासाठी तत्कालीन खासदार सुरेश भाई कलमाडी यांच्या असलेल्या विरोधामुळे शक्य नव्हते. त्यामुळे पुणे महापालिकेमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी असाच उभा संघर्ष पुणेकरांनी पाहिला होता. या दरम्यानच्या काळामध्ये पुणे शहरालगत असलेल्या वडगाव शेरी, हडपसर, खडकवासला व पर्वती भागातून चांगला प्रतिसाद मिळाला. पुणे महानगरपालिका २००७ सार्वत्रिक निवडणूक १४४ जागांसाठी निवडणूक झाली. यामध्ये प्रथमच पुणेकरांनी राष्ट्रवादी कॉग्रेस प्रथम क्रमांकाची मते देऊन ४१ उमेदवार विजयी केले होते. त्यानंतर पुणे शहरात सत्तेत असलेल्या कॉग्रेस पक्षालाही पुणेकरांनी ३६ उमेदवार विजयी करून दुसऱ्या क्रमांकाची मते दिली होती. केंद्र व महाराष्ट्र सरकारमध्ये दोन्ही काँग्रेस एकत्र सत्तेत असल्याने साहजिक या दोन पक्षांची सत्ता पुणे महापालिकेत येईल असे वाटत होते परंतु अजित पवार यांच्या नेतृत्वात पुणे शहरांमध्ये कार्यरत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मात्र नवा ‘पुणे पॅटर्न’ (राष्ट्रवादी कॉग्रेस- ४१, भाजपा – २५ , शिवसेना – २०) अशी अडीच वर्षाची सत्ता उपभोगत मित्रपक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाला विरोधी पक्षात बसवण्याचे काम केले होते. पुण्यातील या अनैसर्गिक युतीचा महाराष्ट्राचा राजकारणावरती परिणाम होण्याची भीती लक्षात घेऊन 2009 मध्ये अचानक काँग्रेस राष्ट्रवादी यांची पुन्हा पुणे महापालिकेत सत्ता स्थापन झाली.

पुणेकरांनी 2007साठी दिलेल्या संमिश्र निकालामुळे पिंपरी चिंचवड प्रमाणे विकास शक्य न झाल्याची हाक देत पुन्हा एकदा पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०१२ विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पूर्ण बहुमताची आर्त हाक दिली. सर्वसामान्य पुणेकरांनी हे या महापालिका निवडणुकीमध्ये एकूण १५६ जागांपैकी 54 उमेदवार विजयी करत पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला प्रथम क्रमांकाची मते दिली. परंतु काँग्रेस पक्षाला लागलेली घरघर आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वाढता प्रभाव यामुळे लक्षणीय वाढ होत पुणे महापालिकेमध्ये विशेष म्हणजे भारतीय जनता पक्ष अपेक्षा जास्त क्रमांक दोनची मते (काँग्रेसच्या समकक्ष) मिळाली होती. या निवडणुकीमध्ये अनुक्रमे राष्ट्रवादी ५४, काँग्रेस २९, मनसे २८ भाजप २६, शिवसेना १५ व इतर ०२ असे पक्षीय बलबल असताना काँग्रेस पक्षाने मागील अनुभव पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर सलगी न करता विरोधी पक्ष नेतेपदावर दावा केला. पुणे महापालिकेमध्ये सर्वसामान्य पुणेकरांनी सलग दोन वेळा (१० वर्ष) सत्तेच्या प्रथम स्थानावरती पसंती दिल्यानंतर सुद्धा काही निवडक बदला व्यतिरिक्त कोणताही ठोस आणि विशेष उल्लेखनीय प्रकल्प न झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मर्यादा स्पष्ट दिसू लागल्या.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

सर्वसामान्य पुणेकरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सलग दोन वेळा सत्तेची संधी दिल्यानंतर महाराष्ट्रात झालेल्या सत्तांतराचा थेट परिणाम पुणे शहरातही जाणू लागला. मुळात कायम निवडणुकीसाठी सज्ज असलेल्या भारतीय जनता पक्षाने 2014 मध्ये महाराष्ट्र राज्याची सत्ता मिळतात स्थानिक स्वराज्य संस्थांवर ताबा मिळवण्याच्या हेतूने आखणी करण्यास सुरुवात केली. पुणे महापालिका सार्वत्रिक निवडणूक- २०१७ मध्ये एकूण 162 पैकी तिप्पट वाढ साध्य करत भाजपा 97 जागी विजय मिळवून ‘नव्या चेहऱ्यांच्या टीम’ च्या माध्यमातून सत्तेत बसली. यावेळीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जास्त फटका न बसता 2007 या मूळ (४१) बलाबलाच्या तुलनेत 39 जागा मिळवण्यात यश आले. परंतु विशेष बाब म्हणजे भारतीय जनता पक्षासोबत सत्तेत असलेल्या शिवसेना पक्षाला मात्र फारसे यश मिळवता आले नाही. पुणे शहरात पूर्वी बलाबलानुसार 10 जागीच यश मिळवता आले. तर पारंपरिक सत्ताधारी असलेल्या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला खूप मोठा फटका बसून केवळ 9 जागी यश मिळवणे शक्य झाले. तर मागील पंचवार्षिक निवडणुकीमध्ये लक्षणीय वाढ झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाची अवस्था सुद्धा काँग्रेस सारखीच म्हणजे केवळ 2 यश मिळवता आले. या निवडणुकीमध्ये अपक्ष 4 व एमआयएम 1 अशी नगरसेवकांची संख्या असली तरी सुद्धा त्यांनीही सत्तेच्या आसपास भूमिका घेतल्याने विशेष वेगळेपण राहिले नाही.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

पुणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा हा बालेकिल्ला मानला जातो. ते पुण्याचे पालकमंत्रीही आहेत. त्यांची पुण्यात लोकप्रियता देखील आहे. तसेच अजितदादा यांचं पुण्याबाबत एक हळवं नातं आहे. अजितदादांची पुण्यात ताकद देखील आहे. पण भाजपचं देखील इथे वर्चस्व आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप पक्षाची राज्यात युती आहे. पण महापालिका निवडणुकीत भाजप स्वबळाची तयारी करत असल्याने हा अजित पवार यांच्यासाठी धक्का आहे. भाजपने आतापर्यंत अनेक वेळा सर्वेक्षण केले असून, त्यानुसार पक्षाला पुणे महापालिकेत पुन्हा बहुमत मिळेल”, असा दावा एकीकडे केला जात आहे तर दुसरीकडे विरोधी पक्ष आणि युतीतील काही कार्यकर्ते भाजपमध्ये येण्यास इच्छुक असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे महायुतीचे मतं विभाजण्याची शक्यता लक्षात घेऊन वरिष्ठ पातळीवर याबाबत काय-काय घटना घडतात ते पाहणं महत्त्वाचं आहे.

पुणे महापालिका मागील ३ निवडणूकमधील पक्षीय बलाबल- 

सार्वत्रिक निवडणूक २००७ :  एकूण जागा – १४४

राष्ट्रवादी कॉग्रेस – ४१. एकूण मते. १,१५,९१९ (टक्केवारी – ६.२७%)

राष्ट्रीय कॉग्रेस -३६. एकूण मते. ९६,५७२ (टक्केवारी – ५.२१%)

भारतीय जनता पार्टी – २५. एकूण मते. ७१,३६३ (टक्केवारी – ३.८५%)

शिवसेना – २०. एकूण मते. ५६,४८९ (टक्केवारी – ३.०५%)

सार्वत्रिक निवडणूक- २०१२ :  एकूण जागा १५६

राष्ट्रवादी ५४ भाजप २६ शिवसेना १५

काँग्रेस २९ मनसे २८ इतर ०२

सार्वत्रिक निवडणूक- २०१७ :  एकूण जागा 162

भारतीय जनता पाटी 97

नॅशनॅलिस्ट कॉग्रेस पार्टी 39

शिवसेना 10  राष्ट्रीय काँग्रेस 9

महाराष्ट्र नवनिर्माण सेना 2

अपक्ष 4 एमआयएम 1