पुण्यात केंद्रीय मंत्री गडकरींचा कार्यक्रम ‘पडला’ शहर कार्यालय खडबडुन जागे; मोदींसाठी 2000 पदाधिकारी नियोजनात

0

प्रकल्प बारामती आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाचे अन उद्घाटनाचे कार्यक्रम पुणे लोकसभा तेही भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या कोथरूड विधानसभा मतदारसंघात! परंतु फक्त ‘पोस्टर बॉईज’ नियोजनामुळे रस्त्यांच्या दुतर्फा अगदी दुभाजकावरही बेकायदेशीर फलकांचे जाळे परंतु प्रत्यक्षात मात्र कार्यक्रमाच्या ठिकाणी गर्दीच न जमल्याने महाराष्ट्र भाजपाचे प्रमुख उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन केंद्रीय मंत्री दोन राज्यातील कॅबिनेट मंत्री असा लवाजमा असतानाही समोर रिकाम्या खुर्च्यामुळे चक्क कार्यक्रम पडला. मुळात कोथरूड विधानसभा मतदारसंघाचा काहीही संबंध नसताना बारामती लोकसभा अन शिरूर लोकसभा या स्थानिक ठिकाणी कार्यक्रम न घेता कोथरूड या मतदारसंघात कार्यक्रम घेतलाच कसा ही चर्चा सुरू असताना तेही आजूबाजूला किमान दहा नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे असतानाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ‘विकास पुरुष’ म्हणून ज्यांची ओळख केली जाते अशा नितीन गडकरी यांचा कार्यक्रम पडणे हे भारतीय जनता पक्षाच्या ‘ जिव्हारी’ लागणे साहजिकच होते. कार्यक्रमानंतर श्रमपरिहाराच्या नावाने शहर पदाधिकाऱ्यांची ‘रत्ना’मध्ये झालेली बैठक असो किंवा चार वाजता झालेला पुणे शहर भाजपा कार्यालयातील ‘कॉन्फरन्स कॉल’ एकच चर्चा सूरू होती कार्यक्रम पडल्याची! जबाबदार कोण?

राज्यात काही दिवसातच आचारसंहिता लागण्याची शक्यता लक्षात घेऊन भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रोजेक्ट असलेला पुणे शहरातील मेट्रो अंतर्गत दुहेरी मार्ग आणि कात्रज ते स्वारगेट नवीन मार्गाचे भूमिपूजन जोरदार करण्यासाठी शेअर कार्यालयाने का टाकली आणि भव्य दिव्य असं कार्यालय बुक करून 2000 पदाधिकारी नियोजनात सहभागी करून घेतले; परंतु लांबलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि विधानसभेला सुरू असलेल्या अंतर्गत स्पर्धा यामुळे नरेंद्र मोदी यांचा कार्यक्रम तरी यशस्वी होतोय की आपल्या अंतर्गत स्पर्धकाला शह देण्यासाठी हाही कार्यक्रम कार्यकर्त्यांकडून पाडला जाते ही चर्चा सध्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये रंगू लागले आहे. भारतीय जनता पक्षामध्ये व्यासपीठावर जाण्यासाठी सुरू असलेली स्पर्धा (शहरभर फलक लावून) जग जाहीर नितीन गडकरी यांचा भारतीय जनता पक्षाच्या बालेकिल्ल्यत पडलेला कार्यक्रम भाजपच्या जिवारी लागला आहे. त्यानंतर खडबडून जागे होत प्रत्येकाला या कार्यक्रमासाठी प्रेक्षक जमा करण्याचे ‘टार्गेट’ च देण्यात आले आहे.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

कर्वेनगर येथील कार्यक्रमावेळी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्रिमंडळातील माझे सहकारी दिलीप वळसे पाटील, खासदार सुप्रिया सुळे, मेधाताई कुलकर्णी, आमदार भीमराव तापकीर, माधुरीताई मिसाळ, उमाताई खापरे, अश्विनीताई जगताप, योगेश टिळेकर, सिद्धार्थ शिरोळे, अमित गोरखे, अशा दिग्गजांची फळी व्यासपीठावरती होती तर शासकीय नियमांप्रमाणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, यांच्यासह जिल्हाधिकारी राष्ट्रीय महामार्ग विभागातील संबंधित अधिकारी ही हजर होते. परंतु या कार्यक्रमात खरी चर्चा रंगली ती प्रेक्षक नसल्याची अन जाहिरात बाजी करून नेत्याच्या पुढे झालेल्या गर्दीची! शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या सह पंढरपूर, देहू आणि आळंदी देवस्थानचे विश्वस्त यांसह इतर मान्यवर उपस्थित होते. भारतीय जनता पक्षाच्या वतीने यावरती विचारमंथन सुरू असताना विरोधकांकडून टीका होणारच की, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर प्रमुख संजय मोरे यांनी थेट कार्यक्रमाचा व्हिडिओ सोशल माध्यमांवरती जाहीर करून चर्चा न होण्यासाठी दबक्या पावालात वाटचाल करणाऱ्या भारतीय जनता पक्षाची पोलखोल करण्याचे काम केले.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शहर प्रमुख संजय मोरे

यांची पोस्ट जशास तशी-

पुणे जिल्ह्य़ातील प्रकल्पाच्या भूमिपूजनानिमित्त कोथरूड जाहिर सभेचे आयोजन केले. दोन केंद्रीय मंत्री, राज्याचे दोन मंत्री, खासदार, आमदारांच्या उपस्थित कार्यक्रमात मोकळ्या खुर्च्यांसाठी सभा होती बेकायदेशीरपणे सत्तेत आलेल्यांना जनता विधानसभा निवडणुकीत नाकारणार याची झलक-

https://x.com/SanjayMore9797/status/1837384333050425695?t=oQjJB2FsI5BP6JyKDH0ehA&s=19

कदाचित आयोजकांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमाला गर्दी होणार नाही याची जाणीव झाल्यामुळेच गर्दीसाठी त्यांनी एक नामी शक्कल लढवली ती म्हणजे जगन्नाथ महाराज पाटील यांची कीर्तन सेवा पण महाराष्ट्रातील आळंदी देवस्थान देहू देवस्थान पंढरपूर देवस्थान यांच्या प्रमुखांना कार्यक्रमांना आमंत्रित केलं. त्यामुळे कार्यक्रम संपल्यावर फक्त आणि फक्त एकच चर्चा सुरू होती ती म्हणजे जगन्नाथ महाराज पाटील यांच्या कीर्तन सेवेमुळे थोडक्यात वाचलो. कारण कार्यक्रमाचे निमंत्रण देताना अशाच प्रकारचे आवाहन करण्यात आले होते-

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

https://www.facebook.com/share/p/n6KwRN8jhzEC5dab/?mibextid=qi2Omg

प्रत्यक्षात ऑनलाइन सहभाग नोंदवणाऱ्यांना मात्र याची कल्पना झाली नाही कारण पुणे जिल्ह्यातील दळणवळण अधिक सुसह्य व्हावे यासाठी नियोजित असलेल्या विविध विकासकामांच्या भूमिपूजन सोहळ्यास उपस्थित सर्वच मान्यवरांनी मोठ मोठ्या घोषणा आणि स्तुती सुमने उधळल्याने कार्यक्रम जोरात झाल्याची चर्चा शहरभर होती. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग क्र. ९६५ मोहोळ-आळंदी दिवेघाट ते हडपसरचे चौपदरीकरण, सातारा विभागातील मुळा-मुठा नदीवरील प्रमुख पुलांचे बांधकाम, सिंहगड-वारजे सेवा रस्ता यांसह चांदणी चौकात पादचारी पूल सदर भूमिपूजन मा. केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी, आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी पालखी मार्गातील २२ थांब्यांवर वारकऱ्यांना निवासासाठी उपाययोजना करणे, कायमस्वरुपी स्वच्छतागृहे, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली. बाणेर-बालेवाडी पाषाण मधील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठीच्या प्रस्तावांची मागणी कारण्यात आली.