गुलाबी स्टेज, गुलाबी बॅनर्स, ‘पिंक पॉलिटिक्स’वर अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

0

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला लोकसभा निवडणुकीत खास कामगिरी करता आली नाही. त्याच्या पक्षाने चार जागांवर निवडणूक लढवली होती. त्यापैकी फक्त एका जागेवर त्यांच्या पक्षाचा उमेदवार विजयी झाला. दरम्यान, आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी चालू केली आहे. त्यासाठी त्यांच्या पक्षाकडून रणनीती आखली जात आहे. विधानसभा निवडणुकीत महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून विशेष प्रयत्न केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून अजित पवार यांच्या सभेचा मंच, त्यांचे जॅकेट यासाठी गुलाबी रंगाचा वापर केला जात आहे. यावरच आता खुद्द अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

अजितदादांच्या राष्ट्रवादीचा गुलाबी रंग

महाराष्ट्र सरकारने नुकतेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालू केली आहे. या योजनेची सध्या सगळीकडे चर्चा आहे. याच योजनेच्या जोरावर महिला मतदार आमच्याकडे आकर्षित होतील, अशी सत्ताधारी महाविकास आघाडाली आशा आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते आपापल्या सभेत महिलांविषयीच्या योजनांचा जास्तीत जास्त उल्लेख करताना दिसतायत. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने तर महिल मतदारांना आकर्षित करण्यासाठी खास रणनीती आखली आहे. अजित पवार यांच्या सभेत बॅनर्स, पोस्टर्स, मंच उभारणी यासाठी जास्तीत जास्त गुलाबी रंगाचा वापर केला जात आहे. विशेष म्हणजे अजित पवार हेदेखील गुलाबी रंगाच्या जॅकेटमध्ये दिसले. याबाबतच पत्रकारांनी अजित पवार यांना बोलतं करण्याचा प्रयत्न केला. अजित पवार यांनी त्यांच्या जॅकेटवर प्रतिक्रिया दिली आहे.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

अजित पवार नेमकं काय म्हणाले?

येथे प्रत्येकानेच वेगवेगळे शर्ट घातलेले आहेत. मला कोणते कपडे परिधान करायचे? हा माझा अधिकार नाही का? मी माझे कपडे माझ्या पैशाने घालतो. तुमच्या कोणच्या पैशाने मी माझे कपडे घेतो का? जे कपडे सामान्य माणूस घालतो, तेच कपडे मी परिधान करतो. मी काहीतरी वेगळं केलेलं नाही. माझ्या सदसदविवेक बुद्धीला स्मरून मला जे योग्य वाटतं ते मी करतो, असे अजित पवार यांनी स्पष्ट केलं. अजित पवार तिसरी आघाडी उभी करण्याच्या प्रयत्नात आहे, अशी चर्चा होती. यावर बोलताना या चर्चेमध्ये काहीही तथ्य नाही. अशा गोष्टी मी एका कानाने ऐकतो आि एका कानाने सोडून देतो, असे अजित पवार म्हणाले.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता