राज्य सरकार धारावीत ‘लाडका मित्र, लाडका उद्योगपती’ योजना राबवतंय; उद्धव ठाकरेंची घणाघाती टीका

0
1

धारावीचा भूखंड अदानीच्या घशात घालून मुंबईला अदानी सिटी करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा डाव आहे. सरकारची लाडका मित्र किंवा लाडका काँट्रॅक्टर किंवा लाडका उद्योगपती योजना सुरु आहे, अशी घणघाती टीका उद्धव ठाकरे यांनी केली. ते शनिवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या मुद्द्यावरुन महायुती सरकारला लक्ष्य केले.

अधिक वाचा  सत्येच्या केंद्रस्थानी कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी शिवसेनेशी युती; मा. आनंदराज आंबेडकरांची भूमिका स्पष्ट झाली

निवडणुका जवळ आल्या आहेत आणि निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे महाआघाडी सरकार फसव्या घोषणांचा पाऊस पाडायला लागलेले आहे. त्यांना असं वाटतं की, त्यांनी आतापर्यंत जो काही कारभार केलाय तो सगळा कारभार जनता विसरेल आणि फसव्या योजना बळी पडून यांना मतदान करेल. अशी त्यांची एक वेडी आहे. मग या योजनांमध्ये ‘लाडकी बहीण’ अशा बऱ्याच काही गोष्ट आहेत. बाकीच्या योजनांबाबत मी आज काही बोलणार नाही त्याच्याबद्दल जनता बोलते, जनता अनुभव घेते आहे. आज मी त्यांच्या एका योजनेबद्दल बोलणार आहे आणि ती योजना म्हणजे ‘लाडका मित्र’ किंवा ‘लाडका कॉन्ट्रॅक्टर’ किंवा ‘लाडका उद्योगपती योजना’. त्या योजनेबद्दल आम्ही गेल्या वर्षी धारावी येथे मोठा मोर्चा काढला होता, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

अधिक वाचा  राज्यात ओबीसी उपसमिती काय काम करणार?; उपसमितीची कार्यकक्षाही निश्चित झाली फडणवीसही सरसावले

धारावीवासियांना आहे तिथेच पाचशे स्क्वेअर फुटाचं हक्काचं घर मिळालंच पाहिजे: उद्धव ठाकरे

धारावीच्या पुनर्वसन प्रकल्पाबद्दल धारावीकरांना त्यांच्या हक्काचा घर तिथल्या तिथे मिळालंच पाहिजे आणि ते सुद्धा 500 स्क्वेअर फुटाचं मिळालंच पाहिजे ही शिवसेनेची आधीही भूमिका होती, हीच भूमिका आजही आहे आणि उद्याही राहील, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. धारावी ही केवळ एक नुसती झोपडपट्टी नाही तर एका त्याच्यात वेगळेपण आहे. ते वेगळेपणाचे इंडस्ट्रियल म्हणजे या प्रत्येक घरामध्ये एक मायक्रोस्केल उद्योग चालतो. मग त्याच्यामध्ये काही ठिकाणी कुंभार पण आले, अगदी इडलीवाले आले, चामड्याचे उद्योग करणारे आले, बऱ्याच गोष्टी आहेत आणि त्या उद्योगधंद्यांचं का करणार, याप्रश्नी आम्ही एक मोर्चा काढला होता, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

अधिक वाचा  भाजपकडून राजकीय सोयीसाठी प्रभागरचनेत नियमांचे उल्लंघन; काँग्रेस-राष्ट्रवादीचा संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप