नीटचा निकाल केंद्रनिहाय जाहीर, NTA वेबसाइटवर डेटा अपलोड…

0

NEET UG 2024 परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. यंदाच्या नीट परीक्षेत मोठा गोंधळ झाल्याचे बघायला मिळतंय. अनेक आरोग्य प्रत्यारोप यावेळी बघायला मिळाले. परीक्षेला बसलेल्या 23 लाखांहून अधिक उमेदवारांचे निकाल आज पुन्हा जाहीर झाले. यापूर्वी NEET UG चा निकाल 4 जून रोजी जाहीर झाला होता. त्यानंतर अनेक गंभीर आरोप करण्यात आले. यामध्ये सतत पेपर फुटीचाही आरोप हा करण्यात आला. हे प्रकरण थेट कोर्टात गेले. सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या. ज्यानंतर 18 जुलै रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने एनटीएला परीक्षा शहर आणि केंद्रनिहाय बसलेल्या सर्व उमेदवारांचे निकाल जाहीर करण्याचे आदेश दिले.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

18 जुलै रोजी झालेल्या सुनावणीमध्ये एनटीएने NEET UG परीक्षेत विद्यार्थ्यांनी मिळवलेले गुण प्रकाशित करण्याच्या सूचना दिल्या होत्या आणि त्या विद्यार्थ्यांची ओळख जाहीर करू नये. आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर NTA वेबसाइटवर निकाल हा अपलोड केला जाईल. xams.nta.ac.in/NEET/ साईटवर जाऊन यूजी 2024 रिजल्ट क्लिक करावे लागेल.

तिथे परीक्षा क्रमांक टाकल्यानंतर स्कोरकार्ड तुम्हाला बघायला मिळेल. निकाल जाहीर झाल्यानंतर या प्रकरणाची पुढील सुनावणी 22 जुलै रोजी होणार आहे. त्यानंतर पुढे काय होणार हे स्पष्ट होईल. परीक्षा शहर आणि केंद्रनिहाय निकालाच्या आधारे सर्वोच्च न्यायालय या प्रकरणी अंतिम निर्णय देऊ शकते.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

विद्यार्थ्यांकडून NEET UG परीक्षा रद्द करून परीक्षा नव्याने घेण्याची मागणी सातत्याने केली जातंय. या परीक्षेत मोठा गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप होतोय. आता 22 जुलै रोजी काही मोठे खुलासे हे केले जाऊ शकतात. परीक्षा रद्द होऊन परत परीक्षा होणार का किंवा अजून काही मोठा निर्णय हा न्यायालयाकडून घेतला जाईल, याबद्दल न्यायालयाकडून निकाल हा दिला जाऊ शकतो.