दि. ०९ जुलै २४. रोटरी क्लब ऑफ पुणे वेस्टसाईडच्या अध्यक्षपदी डिंपल धोत्रे ह्यांची निवड करण्यात आली. मावळत्या अध्यक्षा रुपाली गजेश्वर ह्यांच्याकडून अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारत त्यांनी यावर्षीचे आपल्या क्लबचे विविध सामाजिक उपक्रम हे पंचमहाभूतांवर आधारित राहतील असे आपल्या भाषणात सांगितले. नवनिर्वाचित अध्यक्षांसोबत आनंद इनामदार ह्यांनी सचिवपदाची जबाबदारी मावळते सचिव विश्वजित धोत्रे ह्यांच्याकडून स्वीकारली.






हा सोहळा डेक्कन जिमखाना, पुणे येथे पार पडला. ह्या पदग्रहण सोहळ्याला भावी प्रांतपाल संतोष मराठे, सहाय्यक प्रांतपाल अतुल अत्रे, माजी प्रांतपाल रवी धोत्रे, तसेच डिस्ट्रिक्ट ३९३१ मधील अन्य रोटरी अध्यक्ष व पदाधिकारी आणि डिंपल धोत्रे ह्यांचे कुटुंबीय व मित्रमंडळीही हजर होते.
ह्या दिवशी स्काय-डायवर पद्मश्री शीतल महाजन ह्यांना मानद सभासद म्हणून रोटरी क्लब ऑफ पुणे वेस्टसाईड मध्ये समाविष्ट करून घेण्यात आले. राजश्री पराशर व मनीषा जोशी ह्यांनी गणेश वंदनेने सुरुवात करत जयदीप धोत्रे ह्यांनी वर्ष छान जावो म्हणून गाहाणंही घातलं. कार्यक्रमाची सांगता माऊली धोत्रे आणि सावली धोत्रे ह्यांनी मंजुळ पसायदानाने केली.











