आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी नुकताच प्रशासनाने आकारलेला लेट पासिंगचा दंड प्रतिदिन पन्नास रुपये रद्द करण्यात यावा हा विषय विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित करून हा जुलमी दंड माफ दंड करण्यासाठी रिक्षा चालकांचा आवाज बनुन मोलाचे सहकार्य केल्याबद्दल पुणे शहर रिक्षा चालक-मालक संयुक्त कृती समितीच्या वतीने आमदार माननीय श्री सिद्धार्थ शिरोळे साहेबांना रिक्षाची प्रतिकृती भेट म्हणून देण्यात आली त्याचप्रमाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी, जिल्हाधिकारी ,परिवहन आयुक्त ,उपमुख्यमंत्री ,मुख्यमंत्री या सर्वांशी प्राधान्याने व सकारात्मक चर्चा करून प्रतिदिन पन्नास रुपये दंड माफ करण्यासाठी जे मोलाचे सहकार्य केले त्याबद्दल पुणे शहर संयुक्त कृती समितीच्या वतीने भव्य दिव्य असा सत्कार समारंभ संपन्न करण्यात आला.
पुणे शहर ऑटो रिक्षा फेडरेशनचे अध्यक्ष त्याचप्रमाणे समर्थ सेवा रिक्षा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री आनंद उर्फ बंडूशेठ तांबे, पुणे शहर ऑटो रिक्षा फेडरेशनचे सल्लागार प्रकाश झाडे, विद्यार्थी वाहतूक रिक्षा संघटनेचे अध्यक्ष बापू भावे, सावकाश रिक्षा संघटनेचे अध्यक्ष प्रदीप भालेराव, भाजप वाहतूक आघाडीचे अध्यक्ष अंकुश नवले, शिवनेरी रिक्षा संघटनेचे अध्यक्ष अशोकराव साळेकर, संस्थापक आबा बाबर आझाद हिंद रिक्षा संघटनेचे अध्यक्ष शफिक भाई पटेल, खड्डा गॅरेज अध्यक्ष अल्ताफ भाई शेख, तुषार पवार, संजय केकान व असंख्य रिक्षाचालक बहुसंख्येने उपस्थित होते.
पुणे शहरासह महाराष्ट्रातील 22 लाख रिक्षा चालक मालकांच्या वतीने आमदार सिद्धार्थ शिरोळे त्याचप्रमाणे ज्यांनी ज्यांनी या कामी सहकार्य केले त्या सर्वांचे आभार समर्थ सेवा रिक्षा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आनंद तांबे व संयुक्त कृती समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मानले.