मविआला मोठा धक्का! अजितदादांच्या करामती; महायुतीने मविआची मतं पळवली

0

महाराष्ट्रातील सध्याच्या घडीला सर्वात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या विधान परिषद निवडणुकीचा निकाल आता समोर आला आहे. या निवडणुकीत भाजपच्या पाचही उमेदवारांचा विजय झाला आहे. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही उमेदवारांचा विजय झाला आहे.

तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांचा विजय झाला आहे. या निवडणुकीत महायुतीने महाविकास आघाडीकडे खो दिला आहे. मतांचा कोटा पूर्ण असताना देखील महायुतीने महाविकास आघाडीची मतं पळवली आहेत. त्यामुळे मतांचा कोटा पूर्ण असताना देखील महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे.

आतापर्यंत समोर आलेल्या मतमोजणीच्या माहितीनुसार, महायुतीचे सर्व उमेदवार विजयी झाले आहेत. तर महाविकास आघाडीचे केवळ 3 उमेदवार होते. यापैकी काँग्रेस उमेदवार प्रज्ञा सातव यांचा विजय झाला आहे. तर ठाकरे गटाचे उमेदवार मिलिंद नार्वेकर यांचा जवळपास विजय निश्चित आहे. ते विजयापासून केवळ 1 मताने मागे आहेत. या निवडणुकीत शरद पवार गटाचे पुरस्कृत उमेदवार जयंत पाटील यांना मोठा धक्का बसताना दिसत आहेत. त्यांना 12 मते मिळाली आहेत. तरीही निकाल अजून पूर्णपणे येणे बाकी आहे. थोड्याच वेळात कदाचित अधिकृतपणे संपूर्ण निकालाची माहिती समोर येणार आहे.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

अजित पवारांनी काँग्रेसची 5 मते फोडली…..

या निवडणुकीत काँग्रेसचे 5 मते फुटल्याची माहिती समोर येत आहे. अजित पवार गटाकडे 42 मतं होती. पण अजित पवार गटाला 47 मतं मिळाली आहेत. त्यामुळे काँग्रेसची 5 मतं फोडण्यात अजित पवार गटाला यश मिळालं आहे. याबाबत गेल्या दोन दिवसांपासून चर्चा होती. याशिवाय काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी देखील याबाबत सूचक वक्तव्य केलं होतं. आपल्या पक्षाचे तीन-चार मतं फुटतील, असं कैलास गोरंट्याल उघडपणे म्हणाले होते.

भाजपचे विजयी उमेदवार –

1) पंकजा मुंडे – 26 मतं

2) परिणय फुके – 23 मतं

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

3) सदाभाऊ खोत – 26 मतं

4) अमित गोरखे – 23 मतं

5) योगेश टिळेकर – 23 मतं

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विजयी उमेदवार

1) शिवाजीराव गर्जे – 23 मतं

2) राजेश विटेकर – 24 मतं

शिवसेना विजयी उमेदवार

1) कृपाल तुमाने – 25 मतं

2) भावना गवळी – 24 मतं

काँग्रेसच्या विजयी उमेदवार

1) प्रज्ञा सातव – 25 मतं

शिवसेना ठाकरे गट (विजयी घोषित होणं बाकी)

1) मिलिंद नार्वेकर – 22 मतं

शरद पवार गट पुरस्कृत उमेदवार (निकाल येणं बाकी)

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

1) जयंत पाटील (शेकाप) – 12 मतं