ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडेकर यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांचा एक वादग्रस्त व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकर या सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. ऑडी कारवर लाल दिवा लावल्याप्रकरणी तसेच त्यांच्या प्रमाणपत्राचा वाद सुरू असून खेडकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशातच पूजा खेडेकर यांच्या आईचाही एक वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.






ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडेकर यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांचा एक वादग्रस्त व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्या थेट पिस्तूल काढून शेतकऱ्याला धमकावल्याचे दिसत आहे. मुळशी तालुक्यातील धडवली गावातील हा व्हायरल व्हिडिओ असल्याचे सांगण्यात येत आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, मुळशी तालुक्यातल्या दारवली गावात खेडकर कुटुंबाने 25 एकर जमीन खरेदी केली होती, ती ताब्यात घेताना शेजाऱ्यांचीही जमीन ताब्यात घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. याला जेव्हा शेजारच्या जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांनी विरोध केला, तेव्हा मनोरमा खेडकर या बाउन्सर घेऊन त्या ठिकाणी पोहोचल्या, आणि त्यांनी हातात पिस्तूल घेऊन या शेतकऱ्यांना धमकावले.
दरम्यान, या शेतकऱ्यांनी पौड पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार देण्याचा प्रयत्न केला असता वरून दबाव आला आल्याने त्यांची तक्रार नोंदवली गेली नाही अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. त्यामुळे या खेडकर कुटुंबावर कोणाचा वरदहस्त आहे? हा प्रश्न उपस्थित होत आहे.












