विधानपपरिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे अखर भाजप कॅम्पमध्ये दाखल झाले आहेत. विधान परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत मोहिते पाटील हे भाजप पक्ष कार्यालयात आल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी पक्ष कार्यालयात भाजप नेत्यांशी चर्चा देखील केली. यावेळी भाजप नेते प्रविण दरेकर, भाजप आमदार प्रसाद लाड उपस्थित होते. माढा लोकसभेबाबत रणजितसिंह मोहिते पाटील यांनी घेतलेल्या संशयास्पद भूमिकेमुळे प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. मात्र, अखेर ते भाजपच्या कार्यालयात पाहायला मिळाले.






रणजितसिंह मोहिते पाटील हे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र आहेत. ते सध्या भाजपचे विधनपरिषदेचे आमदार आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांचे चुलत बंधू धैर्यशील मोहिते पाटील हे भाजपकडून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. मात्र, त्यांना भाजपने उमेदवारी दिली नाही. भाजपने पुन्हा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी उमेदवारी दिली. त्यामुळं मोहिते पाटील नाराज होते. अखेर धैर्यशील मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला. त्यानंतर त्यांना लोकसभेचे तिकीट मिळाले. या निवडणुकीत मोठ्या मतांनी धैर्यशील मोहिते पाटील विजयी झाले. या संपूर्ण प्रक्रियेत रणजितसिंह मोहिते पाटील शांत असल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी कोणाचाच प्रचार केला नाही. मात्र. त्यांची भूमिका संशयास्पद असल्याचे बोलले जात होते. तसेच त्यांनी बंधु धैर्यशील मोहिते पाटील यांना मदत केल्याचंही बोललं जात आहे.
माळशिरस भाजपचा विरोधात आणला होता ठराव
रणजितसिंह मोहिते पाटील यांनी विधानपरिषदेच्या आमदारकीचा राजीनामा द्यावा, असा ठराव माळशिरस तालुका महायुतीच्या वतीने करण्यात आला होता. तसेच मोहिते पाटील यांच्या संस्थांची चौकशी करावी अशी मागणी देखील करण्यात आली होती. माळशिरस विधानसभा मतदारसंघ महायुतीची आढावा बैठक माळशिरस येथे घेण्यात आली होती, त्यावेळी ठराव घेम्यात आला होता. भाजपा माळशिरस विधानसभा निवडणुक प्रमुख व भाजपा राज्य कार्यकारणी सदस्य के के पाटील यांनी त्यांच्या राजीनाम्याचा ठराव मांडला. यावेळी आमदार राम सातपुते उपस्थित होते.
2019 मध्ये मोहिते पाटलांनी केला होता भाजपमध्ये प्रवेश
एक अभ्यासू, तरुण तडफदार नेतृत्व म्हणून रणजितसिंह मोहिते पाटील यांची ओळख आहे. मोहिते पाटील हे शरद पवारांचे कट्टर समर्थक होते. मात्र, 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी रणजितसिंह मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंर मोहिते पाटील यांना विधानपरिषदेरवर पाठवण्यात आलं होतं. दरम्यान, यावेळी माढा लोलकसभा मतदारसंघातून भाजपकडून रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. या निवडणुकीत मोहिते पाटील यांनी निंबाळकरांना 1 लाख मताहून अधिक लीड माळशिरस मतदारसंघातून दिलं होतं. निंबाळकरांच्या विजयात मोहिते पाटलांचा मोठा वाटा होता.













