विठ्ठल मंदिर व्हीआयपी दर्शन बंद तरी मंत्र्यांची व्हीआयपी दर्शनाच्या शिफारस पत्रावरून भाविकांमधून तीव्र नाराजी

0
1

आषाढी यात्रेत विठ्ठल मंदिर समितीने व्हीआयपी दर्शन बंद केलेले असतानाही राज्यातील काही मंत्री, खासदारांचा व्हीआयपी दर्शनासाठी अट्टहास सुरूच आहे. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी तर सात जणांना व्हीआयपी दर्शन द्यावे, असे लेखी पत्रच मंदिर समितीला दिले आहे. त्यांचे पत्र सोशल मीडियात व्हायरल झाले आहे. त्यानंतर व्हीआयपी दर्शनावरून दर्शन रांगेतील भाविकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आषाढी एकादशी दिवशी उद्योग मंत्रालयातील विशेष कार्यकारी अधिकारी नितीन सवडतकर व त्यांच्या कुटुंबातील सातजणांना आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठल रुक्मिणीचे व्हीआयपी दर्शन मिळावे, असे शिफारस पत्र मंदिर समितीला दिले आहे. मंत्र्यांच्या या व्हीआयपी दर्शनाच्या शिफारस पत्रावरून वरून भाविकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. सावळ्या विठुरायाचे दर्शन मिळावे यासाठी लाखो भाविक पायी पंढरीकडे येत आहेत. आषाढी यात्रेपूर्वीच विठ्ठल पदस्पर्श दर्शनाची रांग तीन किलोमीटर अंतरापर्यंत गेली आहे. दर्शनासाठी १२ ते १३ तासांचा अवधी लागत आहे.

अधिक वाचा  ओबीसींसाठी उपसमिती गठीत, चंद्रशेखर बावनकुळे अध्यक्ष छगन भुजबळ, पंकजा मुंडेंसह बडे मंत्री सदस्य

दर्शन रांगेतील भाविकांना सुलभ आणि कमीत कमी वेळेत व्हावे, यासाठी मंदिर समितीने सात जुलै पासून व्हाआयपी दर्शन बंद केले आहे. पोलिस आणि मंदिर समितीकडून काटेकोरपणे अंमलबजावणी सुरू असतानाच काही खासदार आणि मंत्र्यांकडून व्हीआयपी दर्शनासाठी अहट्टास धरल्याचे समोर आले आहे.

बुधवारी (ता. १०) शिवसेनेचे खासदार संदीपान भुमरे व त्यांच्या कार्यकर्त्यांना व्हीआयपी दर्शन दिल्याचा प्रकार समोर आला आहे. व्हीआयपी दर्शनावरून पोलिस आणि भुमरे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक वादावादी ही झाली होती. हे प्रकरण ताजे असतानाच उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिलेल्या व्हीआयपी दर्शनासाठी दिलेले समोर आले आहे. मंत्री सामंत यांच्या पत्रानंतर भाविकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

अधिक वाचा  राज्यात ओबीसी उपसमिती काय काम करणार?; उपसमितीची कार्यकक्षाही निश्चित झाली फडणवीसही सरसावले