दिलीप वेडेपाटील फाउंडेशन तर्फे “वारकऱ्यांची आरोग्य सेवा, हीच पांडुरंग सेवा” ची 5000 किटचे वितरण

0

दि:५ जुलै २०२४ रोजी सालाबाद प्रमाणे दिलीप वेडेपाटील फाउंडेशन – पुणे यांच्यातर्फे यावर्षी देखील वारकरी संप्रदायाचा समृद्ध वारसा जपत श्री. संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यानिमित्त पांडुरंगा चरणी सेवा रुजू करण्यासाठी खडकवासला विधानसभा मतदार संघातील 5000 वारकरी बंधू-भगिनींना औषध प्रथमोपचार पेटी व शबनम ( बॅगचे ) मोफत वाटप वाल्हे – जेजुरी येथे सहकाऱ्यांसोबत जाऊन करण्यात आले.

पालखी सोहळ्यात सहभागी वारकरी अनेक किलोमीटर पायी चालत पंढरपुरी विठुरायाच्या दर्शनासाठी जात असतात. आपला लाडक्या विठुरायाच्या प्रेमापोटी पायी चालणाऱ्या या वारकऱ्यांची आरोग्य सेवा घडावी या हेतूने ‘भक्ती विठुरायाची, काळजी आरोग्याची’ हे ब्रीद वाक्य मनाशी धरून खडकवासला मतदार संघातील सर्व दिंडीच्या वारकरी मंडळींना प्रथमोपचार पेटीचे वाटप केले. या पेटीमध्ये आवश्यक अश्या 10 वेगवेगळ्या प्रकारच्या औषधांचा समावेश असून औषध कसे वापरायचे याची देखील माहिती देण्यात आली आहे. प्रथमोपचार पेटीसह आवश्यक सामान ठेवण्यासाठी उत्तम दर्जाच्या शबनम बॅगचे वाटप केले. या सेवेसाठी वारकऱ्यांनी आभार मानून समाधान व्यक्त केले. यावेळी मा.नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांच्यासह रमेश वेडेपाटील, विजय करंजावणे, शंकर वेडेपाटील, नवनाथ तोडकर, भूषण वेडेपाटील, शैलेश वेडेपाटील, रमेश हुलावळे, मच्छिंद्र चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार