कुठल्याही परिस्थितीत हडपसर विधानसभेची जागा महाविकास आघाडीतील शिवसेना (उबाठा) पक्षालाच मिळावी या एकमुखी मागणीसाठी मेळावा संपन्न 

0
24
  1. •हडपसर प्रतीनीधी : महाराष्ट्रात अतिशय प्रतिष्ठेची लढत ठरलेल्या शिरूर लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे हे प्रचंड मताधिक्याने विजयी झाले. खासदार अमोल कोल्हे यांना निवडून आणण्यासाठी हडपसर विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांनी जीवाचे रान केले. 1995 पासून हडपसर विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये निवडून आलेलले भाजपा आमदारानी शिवसेना संपवण्याचा विडा उचलल्याने 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसैनिक आणि हडपसरकरांनी त्यांना त्यांची जागा दाखवली. हडपसर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदारांना 2014 मध्ये 29 हजार मते पडली होती ते 2019 च्या विधानसभा निवडणुकीत 92 हजार कसे झाले ? विद्यमान आमदारांना आपल्या कार्यकाळामध्ये हडपसरकरांना अभिमान वाटेल असे एकही ठोस विकासकाम करता आले नाही. नाट्यगृह पाणी प्रश्न, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, रस्ते आदी प्रश्न जैसे थे असून माजी आमदार महादेव बाबर यांच्या कार्यकाळात हडपसर विधानसभा मतदारसंघात अनेक विकासात्मक कामे झाली आणि मार्गी लागले. माजी आमदार महादेव बाबर यांनी अहोरात्र सार्वजनिक कार्यात स्वतःला वाहून घेतल्याने ते सर्वांना सहज उपलब्ध होणारे सर्वव्यापी आणि सर्वसमावेशक कट्टर असे निष्ठावान नेतृत्व आहे त्यामुळे उंबरठ्यावर येवून ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतर्फे शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षालाच माजी आमदार महादेव बाबर यांच्या रूपाने उमेदवारी मिळावी या मागणीसाठी हडपसर शिवसेना (उबाठा) कार्यकर्ते व पदाधिकारी आक्रमक झाले असून हडपसर जागेवरून मविआमध्ये संघर्ष उभा राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अधिक वाचा  ‘समस्त कोथरूड’ने देखाव्यांची ‘संस्कृती’च बदलली; सर्वत्र जिवंत देखावे अन् पौराणिक मंदिरे

हडपसर येथील कन्यादान मंगल कार्यालय येथे रविवार (दि.७) शिवसेना (उबाठा) पक्षाचा भव्य कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला.माजी आमदार महादेव बाबर, पुणे शहर प्रमुख संजय मोरे, जिल्हा प्रमुख विजय देशमुख, उपशहर प्रमुख समीर तुपे, संघटक अमोल हरपळे, महेंद्र बनकर, विद्या होडे, रेणुका साबळे, माजी नगरसेविका संगिता ठोसर, माजी नगरसेविका मेधा बाबर, आप्पासाहेब गायकवाड, यांनी आपले मते परखडपणे मांडत आपल्या भावना व्यक्त केल्या.

यावेळी माजी नगरसेवक तानाजी लोणकर, माजी नगरसेवक भरत चौधरी, माजी नगरसेविका प्राची आल्हाट, राजेंद्र बाबर, सतिश जगताप, सतिश कसबे, दत्ता खवळे, हडपसर विधानसभा अंतर्गत सर्व गट प्रमुख, विभाग प्रमूख, युवा सेना पदाधिकारी, महिला आघाडी पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.

अधिक वाचा  कोथरूड सर्वपक्षीय गणेश विसर्जन नियोजन समिती; 17वा विसर्जन नियोजन महोत्सव…तोच उत्साह …तोच ध्यास!

या मेळाव्यात सामान्य कार्यकर्ते पदाधिकारी व वरिष्ठ नेते या सर्वांचा हडपसर विधानसभेबाबत एकच सूर दिसून आला. कुठल्याही परिस्थितीत हडपसर विधानसभेची जागा महाविकास आघाडीतील शिवसेना (उबाठा) पक्षाला मिळावी या एकमुखी मागणीवर सर्वांची मते घेण्यासाठीच हा मेळावा आयोजित केल्याचे बोलले जात आहे.

वास्तविक हडपसर विधानसभेत शिवसेना (उबाठा) पक्षाची मजबूत पकड असतानाही मागील १० वर्षे शिवसेनेचा आमदार निवडून येवू शकलेला नाही. कार्यक्रमाचे प्रस्ताविक पुणे शहर संघटक नितीन गावडे यांनी तर सूत्रसंचालन के टी आरु यांनी केले. मेळाव्याला मोठ्या संख्येने युवा सेना कार्यकर्ते, शिवसैनिकांसह महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

अधिक वाचा  मराठा समाजानंतर OBC समाजासाठीही उपसमितीची स्थापना; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय