विराट कोहली भारत कायमचा सोडणार? ‘या’ देशात होणार स्थायिक; दोघे या कंपनीचे संचालकही झाले

0
14

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे भारतातील प्रसिद्ध जोडप्यांपैकी आहेत. यामुळेच त्यांच्या प्रत्येक हालचाली कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी धडपड सुरु असते. पण विराट आणि अनुष्काने नेहमीच आपल्या खासगी आयुष्यात डोकावून पाहू नका अशी विनंती केली असून लाईमलाईटपासून दूर राहण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान विराट कोहली आणि अनुष्का शर्मा दुसरा मुलगा अकायच्या जन्मापासून लंडनला कायमचं शिफ्ट होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. सोशल मीडियावर तशी चर्चा रंगली असून, काही नेटकऱ्यांनी ही शंका व्यक्त केली आहे.

अनुष्का शर्मा लंडनमध्ये 

अनुष्का शर्मा सध्या तिच्या दोन मुलांसह वामिका आणि अकायसोबत लंडनमध्ये आहे. बार्बाडोसहून भारतात परतल्यानंतर विराट कोहलीही त्यांना भेटण्यासाठी लंडनला गेला आहे. 29 जूनला भारतीय संघाने टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर विराट कोहलीने टी-20 क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. दरम्यान विराट आणि अनुष्का साधं आयुष्य जगण्याच्या हेतूने कायमचे लंडनला स्थलांतरित होणार असल्याची चाहत्यांना शंका आहे.

अधिक वाचा  मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं मराठे पुन्हा तहात हरले? शासन निर्णयावर कोण कोण काय म्हणालं?

अनुष्का आणि विराट अनेकदा लंडनमध्ये दिसल्यानंतर या चर्चांना उधाण आलं आहे. 2023 मध्ये विराटने त्याच्या व्यग्र वेळापत्रकातून ब्रेक घेतला आणि अनुष्कासोबत लंडनमध्ये काही वेळ घालवला. एका व्हायरल फोटोमध्ये अनुष्का आणि विराट लंडनमधील एका रेस्तराँच्या बाहेर दिसले होते. अकायच्या जन्माची घोषणा झाल्यानंतर काही दिवसांनी विराट वामिकासोबत लंडनमधील रेस्तराँमध्ये दिसला होता.

मुलाचा जन्मही लंडनमध्ये?

त्यामुळे अकायचा जन्म लंडनमध्ये झाला असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. अनुष्का शर्माने तिच्या गरोदरपणाचे अनेक महिने प्रसिद्धीपासून दूर राहत लंडनमध्ये घालवले होते. अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी जन्मानंतर पाच दिवसांनी मुलगा झाल्याचं जाहीर केलं होतं. तोपर्यंत, चाहत्यांना अकायच्या जन्माबद्दल काहीच माहिती नव्हती. मुंबईत एखादा सेलिब्रेटी असताना ही बातमी लपून राहण्यासारखी नाही. रिपोर्ट्समध्ये असाही दावा करण्यात आला आहे की, विराट कोहलीने भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेतून वेळ काढत दुसऱ्या मुलाच्या जन्मासाठी इंग्लंडला गेला होता.

अधिक वाचा  राज्यव्यापी OBC नेते आक्रमक थेट मराठा आरक्षणाचा शासन निर्णय फाडला, राज्यव्यापी आंदोलनही करणार 

विराट आणि अनुष्का या दोघांनीही नेहमीच आपलं आयुष्य फार साधं असून सतत प्रसिद्धीझोतात राहणं आवडत नसल्याचं सांगितलं आहे. त्यांना त्यांच्या मुलांसोबत सर्व सामान्यांप्रमाणेच सर्व गोष्टी करत जगायचं आहे.

अनुष्काच्या अनुपस्थितीमुळे दाव्यांना बळ

अनुष्का शर्माच्या बॉलिवूड कार्यक्रम आणि चित्रपटांमधील अनुपस्थितीमुळेही या दाव्याला बळ मिळत आहे. गतवर्षी अनुष्काने आपल्याला आता जास्त चित्रपट करायचे नाहीत आणि त्याऐवजी कुटुंबासोबत वेळ घालवायचा आहे असं सांगितलं होतं. “मला अभिनयाची आवड आहे पण मी पूर्वी जेवढे चित्रपट करत होते तेवढे जास्त चित्रपट करायचे नाहीत. मला वर्षातून एक चित्रपट करायचा आहे, मला आवडलेल्या अभिनय प्रक्रियेचा आनंद घ्यायचा आहे आणि मी जसं आहे तसं माझं आयुष्य संतुलित करायचं आहे, मला कुटुंबाला वेळ द्यायचा आहे,” असं ती म्हणाली होती.

विराट कोहलीनेही अनेकदा लंडनमध्ये आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवणे आवडतं, कारण तिथे त्यांना जास्त लोक ओळखत नाहीत असं सांगितलं होतं. “आम्ही देशात नव्हतो. फक्त दोन महिने मला, कुटुंबाला सामान्य वाटावं यासाठी हा एक वास्तविक अनुभव होता. कुटुंबासमवेत वेळ घालवण्याची संधी मिळाल्याबद्दल देवाचे अधिक आभार मानू शकत नाही. रस्त्यावर चालणारी एक व्यक्ती असणं आणि कोणीही तुम्हाला न ओळखणं हा एक अद्भुत अनुभव आहे,” असं विराटने सांगितलं होतं.

अधिक वाचा  पुणे महापालिका प्रभाग रचनेवर हरकतींचा पाऊस; शेवटचा दिवस; उत्तर आणि दक्षिण टोकावरील या प्रभागावर सर्वाधिक हरकती

“एकदा मी गेलो, की गेलो”

तसंच मे महिन्यात विराट म्हणाला होता की, “एकदा मी गेलो, की गेलो. तुम्हा मला बराच काळ पाहू शकणार नाही. त्यामुळे मी आहे तोपर्यंत मला खेळाला सर्वस्व द्यायचं आहे. हीच एकमेव गोष्टी मला पुढे जाण्यास मदत करत आहे”.

हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, अनुष्का आणि विराट ब्रिटनमधील एका कंपनीचे संचालक आहेत. रिपोर्टनुसार, यूके सरकारच्या Find and Update company information service नुसार दोघे मॅजिक लॅम्पच्या तीन संचालकांमध्ये आहेत. ही एक व्यवस्थापन सल्लागार कंपनी आहे. कंपनीचा अधिकृत कार्यालयाचा पत्ता वेस्ट यॉर्कशायर, यूके येथे आहे.