मुंबई महानगरात काल मध्यरात्रीनंतर १ वाजेपासून ते आज सकाळी ७ वाजेपर्यंत मुसळधार पाऊस कोसळत आहे. या सहा तासांच्या कालावधीत विविध ठिकाणी ३०० मिलिमीटर पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. काही सखाल भागांमध्ये जोरदार पावसामुळे पाणी साचल्यामुळे उपनगरीय रेल्वे सेवा देखील विस्कळीत झाली आहे. याच पार्श्वभूमीवर शाळांना सुट्टी देखील देण्यात आलीय.






पावसामुळे शाळांना सुट्टी
आज देखील जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मुंबई महानगरातील सर्व महानगरपालिका, शासकीय आणि खासगी माध्यमांच्या शाळांना तसेच महाविद्यालयांच्या पहिल्या सत्रासाठी सुट्टी जाहीर करण्यात येत आहे. परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील सत्रांसाठीचा निर्णय जाहीर करण्यात येईल, अशी माहिती संबंधित प्रशासनाने दिली आहे.
रेल्वे स्थानकांवर देखील प्रवाशांची मोठी गर्दी
जोरदार पावसामुळे झोपडपट्टीतील गटारं देखील उन्मळून वाहू लागलेत. याच गटारांचं पाणी घरात शिरल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. घरातील सामान देखील पाण्यामुळे भिजून गेले असून यामुळे नागरिकांना मोठ्या नुकसानीचा सामना देखील करावा लागत आहे. रेल्वे स्थानकांवर देखील प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
अंधेरीत सगळे देखील तीन ते चार फुटापर्यंत पाणी साचल्यामुळे अंधेरी परिसर वाहन चालकांसाठी बंद करण्यात आलेला आहे. वाहतूक पोलिसांकडून या ठिकाणी बौरेगेट लावण्यात आले आहेत. महापालिकेचे आपत्ती नियंत्रण विभागाकडून या ठिकाणी पाणी उपसण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक देखील काही काळ ठप्प झाली होती. मात्र, पावसाचा जोर कमी झाल्याने हळूहळू रेल्वे वाहतूक पूर्ववत करण्यात येत आहे.











