गुहागर: “गेल्या १०८ वर्षांपासून चाललेला संघर्ष या संघर्षाचे फलित म्हणजे यातून निर्माण झालेले प्रजासत्ताक भारत देशाचे संविधान होय. समता, स्वतंत्र, विश्वबंधुता, समानता या मूलभूत तत्वांच्या माध्यमातून सर्वच स्तरातील मानवाला मिळालेलं स्वतंत्र होय म्हणूनच स्त्रीमुक्ती म्हणजे काय तर पुरुषांच्या बरोबरीने काम करने” असे प्रतिपादन प्रमुख वक्ते या नात्याने बोलत असताना सौ. सरोज समाधान पैठणे (महासचिव राष्ट्रीय मूलनिवासी संघ, महाराष्ट्र) यांनी केले.






बौद्धजन सहकारी संघ, गिमवी विभाग क्र. ३ संलग्न महिला मंडळ त्याचप्रमाणे शाखा क्र. ३० झोम्बडी (गाव व मुंबई) यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथम महिला शिक्षिका माता सावित्रीबाई फुले यांचा १९३ वा जयंतीमहोत्सव आणि त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांचा १२६ वा जयंतीमहोत्सव विभागीय महिला मंडळाच्या अध्यक्ष प्रियांका मोहिते आणि सभा अध्यक्ष राजेश मोहिते यांच्या अधिपत्याखाली बुद्धीविहार झोम्बडी ता. गुहागर, जिल्हा रत्नागिरी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
सदर प्रसंगी चंद्रकांत गमरे यांनी सुमधुर वाणीने धार्मिक विधी पार पाडला, तद्नंतर सारिका संतोष पवार व सभा अध्यक्ष राजेश मोहिते यांच्या शुभहस्ते शाल, पुष्पगुच्छ देऊन उपस्थित पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले, विभागाचे सरचिटणीस निलेश गमरे यांनी अत्यंत लाघवी व प्रभावी शैलीने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
अध्यक्षीय भाषणात पैठणे मॅडम यांनी माता जिजाऊ, माता अहिल्याबाई होळकर, माता सावित्रीबाई फुले, माता रमाई आंबेडकर यांचा खडतर जीवन प्रवास, जडणघडणीचा आलेख व अद्वितीय कार्याचा आढावा अत्यंत साध्य सोप्या व सहज समजेल अश्या भाषेत प्रभावीपणे मांडला. सदर प्रसंगी संघाचे विश्वस्त राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे (मुंबई), सरचिटणीस महेंद्र मोहिते, अध्यक्ष राजेश मोहिते आदी मान्यवरांनी अमूल्य विचार व्यक्त करून उपस्थितांना मार्गदर्शन केले.
सदर प्रसंगी माजी चेअरमन रवींद्र मोहिते गुरुजी, समिष्ठा पवार (भारतीय मुक्ती मोर्चा), समाधान पैठणे, गुहागर हायस्कूलचे पवार मॅडम, जाधव मॅडम, गझवी मॅडम, माजी विभाग अधिकारी मनोज गमरे, उद्योजक भूषण पवार (दै. सार्वभौम राष्ट्र प्रतिनिधी) तसेच प्रत्येक गावातील पदाधिकारी, महिला मंडळ, सभासद, कार्यकर्ते विभागातील जवळपास अडिशेहून अधिक महिला आदि मोठ्या संख्येने उपस्थित होते. सरतेशेवटी सभा अध्यक्ष राजेश मोहिते यांनी सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या सर्व विभागातील विभाग अधिकारी, विभाग कमिटी, शाखांचे शाखा अध्यक्ष, पदाधिकारी, सभासद, कार्यकर्ते, महिला मंडळ, धमदान करणारे दानवीर या सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.











